सप्टेंबरच्या तिमाहीत 'या' कंपनीला इतक्या कोटींचा नफा; आता स्टॉक स्प्लिटची तयारी!
अमेरिकी शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजाराने मागील आठवड्यापासून मोठी आपटी खाल्ली आहे. अशातच भारतीय शेअर बाजार देखील मंगळवारी (ता.६) सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. मंगळवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स जवळपास १६६ अंकांनी घसरून, ७८,५९३.०७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी ६३.०५ अंकांनी घसरून, २३,९९२.५५ अंकांवर बंद झाला.
सकाळी शेअर बाजाराची दमदार सुरुवात
सोमवारच्या मोठया घसरणीनंतर मंगळवारी सकाळी बाजार उघडताच, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दमदार राहिली. बीएसईचा सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टी देखील 24,300 अंकांच्या वर उघडला. मात्र, दिवसाच्या शेवटी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स १६६ अंकांच्या तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी ६३.०५ अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : शेअर बाजारात आपटी, अन् एकाच दिवसात अंबानी-अदानी यांचे हजारो कोटींचे नुकसान!
गुंतवणूकदारांचे १.५७ लाख कोटींचे नुकसान
परिणामी, मंगळवारी (ता.६) बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवारी घसरल्याने, गुंतवणूकदारांचे तब्बल १.५७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप, सोमवारच्या ४४१.८४ लाख कोटी रुपयांवरून मंगळवारी ४४०.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
हेही वाचा : ‘ही’ इथेनॉल कंपनी आणणार 1,000 कोटींचा आयपीओ; पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ समभाग आज तेजीसह बंद झाले. यामध्ये जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.३२ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी), एचसीएल टेक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) यांचे शेअर्स १.२६ ते १.६३ टक्क्यांपर्यंत वधारले. तर सेन्सेक्सचे उर्वरित १९ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक १.७७ टक्क्यांनी घसरले. याशिवाय भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स ०.८३ टक्के ते १.४४ टक्के घसरण झाली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)