Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याच्या मुलाने उभारली कंपनी; …करतोय जपान, अमेरिकेला रेफ्रीजरेटर, एअर कंडीनरचा पुरवठा!

जगात अशक्य असे काहीच नसते. एखाद्या क्षेञामध्ये जीव ओतून काम केले की त्या क्षेञात यश हे मिळतेच, हे एका शेतकऱ्याच्या मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याच्या कंपनीमध्ये उत्पादित होणारी उत्पादने ही जपान, अमेरिका यांसारख्या देशात निर्यात होत आहे. विशेष म्हणजे त्याच्या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 17, 2024 | 04:11 PM
शेतकऱ्याच्या मुलाने उभारली कंपनी; ...करतोय जपान, अमेरिकेला रेफ्रीजरेटर, एअर कंडीनरचा पुरवठा!

शेतकऱ्याच्या मुलाने उभारली कंपनी; ...करतोय जपान, अमेरिकेला रेफ्रीजरेटर, एअर कंडीनरचा पुरवठा!

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसायामध्ये उतरत आहे. आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अनेक जण व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर, व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक जणांना व्यवसायात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीनर तयार करणाऱ्या कंंपनीची स्थापना करत मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांची कंपनी आज जपानी आणि अमेरिकेत देखील आपली उत्पादने निर्यात करत आहे.

नोकरीला ठोकला रामराम

संतोष कुमार यादव असे या व्यावसायिकाचे नाव असून, ते राजस्थानसधील तिजारा या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. ते शेतकरी कुटुंबातून असून, त्यांनी मॅकेनिकल इंजीनियरिंगपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी एका कंपनीत काही काळ नोकरी देखील केली. माञ, नोकरीत मन रमत नसल्याने, त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये लॉयड इलेक्ट्रिक अॅन्ड इंजीनियरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये संतोष यांनी नोकरी सुरू केली होती. 2013 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकत, व्यवसायात पाउल ठेवले.

हेही वाचा – येत्या आठवड्यात खुला होणार ‘हा’ आयपीओ, पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!

देशविदेशात पुरवतायेत आपली उत्पादने

विशेष म्हणजे त्यांनी रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीनर निर्मिती करण्याच्या व्यवसायात पाउल ठेवले त्यावेळी त्यांना इतके यश मिळेल, असे वाटले नव्हते. माञ, ते सध्या डायकिन, स्नायडर, किर्लोस्कर आणि ब्लू स्टार सारख्या कंपन्यांना आपली उत्पादने पुरवत आहेत. याशिवाय अमेरिका आणि कॅनडासह जगातील नऊ देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात देखील करत आहे. यामध्ये त्यांनी देशविदेशात होणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेऊन, आपली उत्पादने जागतिक बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मोठे यश मिळाले असल्याचे ते सांगतात.

लवकरच कंपनीचा आयपीओ खुला होणार

विशेष म्हणजे संतोष कुमार यादव यांच्या कंपनीचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर आता कंपनीने शेअर बाजारात आपला आयपीओ लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला आपला आणखी एक प्लांट उभारायचा आहे. त्यासाठी कंपनीला सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेकडून आयपीओ लॉंच करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात संतोष कुमार यांच्या लॉयड इलेक्ट्रिक अॅन्ड इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ बाजारात येणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी जवळपास 250 कोटी रुपये उभारणार आहे.

Web Title: Success story company set up by a farmers son supplying refrigerators air conditioners to japan and america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 04:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.