Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हाधिकारी पदाला ठोकला रामराम; ‘या’ व्यवसायाच्या माध्यमातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

डॉ. सैयद सबाहत अजीम या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देत व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स या नावाने, सुरु केलेल्या व्यवसाय ब्रॅंडच्या माध्यमातून छोट्या दवाखान्यांच्या आता अनेक जिल्ह्यांमध्ये शाखा पसरल्या आहेत. त्यांच्या ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स या नावाने, सुरु झालेल्या व्यवसाय ब्रॅंडचा विस्तार आज कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 23, 2024 | 03:43 PM
जिल्हाधिकारी पदाला ठोकला रामराम; 'या' व्यवसायाच्या माध्यमातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

जिल्हाधिकारी पदाला ठोकला रामराम; 'या' व्यवसायाच्या माध्यमातून उभारले कोट्यवधींचे साम्राज्य!

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या घडीला अनेक जण व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. मात्र, आता एखाद्या व्यक्तीने व्यवसाय धंद्यात आपला ठसा उमटवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी अर्थात आयएएस पदाचा राजीनामा दिल्याचे तुम्हांला सांगितल्यास, तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हे अगदी खरे आहे. डॉ. सैयद सबाहत अजीम असे या व्यावसायिक अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी सुरू केलेल्या छोट्या दवाखान्याच्या आता अनेक जिल्ह्यांमध्ये शाखा पसरल्या आहेत. त्यांनी ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स या नावाने, सुरु केलेल्या व्यवसाय ब्रॅंडचा विस्तार आज कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्सची स्थापना

डॉ. सय्यद सबहत अजीम हे माजी आयएएस अधिकारी आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आयएएसची नोकरी सोडली. त्याच्या वडिलांचा कोलकाता येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. देशभरातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी स्वस्त दरात हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2010 मध्ये, सबाहत अझीम यांनी ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्सची स्थापना केली. ही परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी आहे. वैद्यकीय सुविधांअभावी वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी अ्न्य कोणाला असा त्रास होऊ नये, यासाठी या क्षेत्रात उतरण्याच्या निर्णय घेतला.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, शेअर बाजारात आणतोय मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांना करणार मालामाल!

वडिलांच्या मृत्यूनंतर उतरलेत वैद्यकीय सुविधांच्या व्यवसायात

डॉ. अजीम यांच्या वडिलांचा कोलकाता येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेने त्यांना आयएएस पद सोडण्याची आणि लोकांना परवडणारी आरोग्य सेवा देण्याची प्रेरणा मिळाली. या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पदाच्या राजीनाम्यानंतर 2010 मध्ये ग्लोकल हेल्थकेयर सिस्टम्स (जीएचएस) या परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी स्थापन केली. वैद्यकीय सुविधांअभावी आपल्या वडिलांचा मृत्यू होऊ शकतो. तर भारतातील कोणत्याही सामान्य नागरिकांसोबत देखील हे घडू शकते. हे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. सय्यद सबहत अजीम यांनी वैद्यकीय सुविधांच्या उभारणीसाठी परवडणाऱ्या रुग्णालयांची साखळी तयार केली.

अनेक जिल्ह्यांमध्ये उभारल्या आहेत शाखा

अझीम यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (JNMC), अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवला. त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकारच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकिय सेवेतील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सुविधांच्या उभारणीसाठी आपल्या गावात 30 खाटांचे छोटेसे आरोग्य केंद्र बांधून सुरुवात केली. पण, लवकरच त्याच्या उद्योगाचा विस्तार केला. आता त्यांची रुग्णालयाची साखळी पश्चिम बंगालमधील बीरभूम, बांकुरा, मुर्शिदाबाद, वर्धमान, दार्जिलिंग आणि नादिया अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या व्यवसायाचे साम्राज्य आज तब्बल करोडोंच्या घरात पोहोचले आहे.

डॉ. अझीम यांनी ग्रामीण भारतात परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने अनेक लोकांच्या जीवन वाचण्यास मदत झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांसाठी, त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या श्वाब फाउंडेशन फॉर सोशल एंटरप्राइझने वर्ष 2020 चे सामाजिक उद्योजक म्हणून निवडले आहे.

Web Title: Success story former ias officer dr saiyad sabahat azim starts his own business global healthcare system after leaving collectors job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 03:43 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.