
कधीकाळी करायचे रस्त्यावर आईस्क्रीम विक्री; आज वर्षाला करतायेत 7200 कोटींची उलाढाल!
सध्याच्या घडीला तरुण व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, व्यवसाय करताना योग्य दिशा मिळाल्यास, यश हे नक्की मिळते. आज आपण अशाच एका व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या व्यक्तीने कधीकाळी केवळ १३ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून आपला व्यवसाय सुरु केला होता. मात्र, आज त्यांच्या याच भांडवलातून तब्बल ७२०० कोटींची कंपनी उभी राहिली आहे.
आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणात खोडा
आरजी चंद्रमोगन (75 वर्ष) असे या व्यावसायिकाचे नाव असून, ते दक्षिण भारतातील चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या आर्थिक विवंचनेमुळे मध्येच शिक्षण थांबवावे. मात्र, त्यांनी हार न मानता 1970 मध्ये 21 वर्षीय चंद्रमोगन यांनी चेन्नईच्या रोयापुरम भागात 250 स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली. त्या ठिकाणी त्यांनी तीन कर्मचाऱ्यांसह स्वतःची आईस्क्रीम कंपनी स्थापन केली. जी आज तब्बल ७२०० कोटींची कंपनी बनली आहे.
दक्षिणेकडील बड्या उद्योगपतींमध्ये गणना
याशिवाय आज आरजी चंद्रमोगन (75 वर्ष) यांची दक्षिण भारतातील बड्या उद्योगपतींमध्ये गणना होत आहे. त्यांची कंपनी हटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स ही देशातील सर्वात मोठी खासगी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे. १६ वर्षांनंतर त्यांनी 1986 मध्ये आपल्या कंपनीचे नाव बदलून, हटसन ॲग्रो प्रॉडक्ट्स केले. त्यांच्या हटसन कंपनीने Arockya आणि Gomatha सारख्या लोकप्रिय ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले. त्यांच्या या ब्रॅन्डने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्याची बाजारपेठ काबीज केली आहे.
हे देखील वाचा – तब्बल 47,500 कोटी संपत्तीची मालकीन, वाचा… कोण आहे ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला!
करताहेत वार्षिक 7,200 कोटींची उलाढाल
हटसन ॲग्रोचा व्यवसाय जसजसा वाढत गेला. तसतशी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत गेली. आज कंपनीत आरजी चंद्रमोगन यांच्या कंपनीत 8,000 लोक काम करतात. चंद्रमोगन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आणि व्यावसायिक कौशल्याचा हा पुरावा आहे. कंपनीकडे सध्या 1,000 पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लर आहेत. ज्यांचे जाळे तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात पसरले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या आइस्क्रीम व्यवसायातील अरुण आइस्क्रीम कंपनीने 2023 मध्ये 7,200 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.