Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!

केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे लक्ष्य गाठले आहे. अशातच आता सरकारला डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यावर सरकारकडून निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 12, 2024 | 04:42 PM
पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!

पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. सध्याच्या घडीला देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जे सरकारकडून लवकरच साध्य केले जाण्याची शक्यता आहे. अशातच आता सरकारकडून डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा विचार केला जात आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे २० टक्क्यांचे लक्ष्य साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहचले आहे. येत्या दोन वर्षात हे लक्ष्य गाठले जाऊ शकते. त्यामुळे सरकारकडून आता डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा विचार सुरु आहे.

इथेनॉल मिश्रणाचा प्रस्ताव पीएमओकडे

केंद्र सरकारला डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. यावेळी सर्व संबंधित मंत्रालयाचे मंत्री आणि अधिकारी पंतप्रधान कार्यालयात उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर सरकारकडून विचार सुरु असून, या प्रस्तावाचे मूल्यांकन झाल्यानंतर त्यावर केंद्र सरकारकडून निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळतोय 7000 रुपये क्विंटलचा भाव; वाचा… आजचे बाजारभाव!

इथेनॉलच्या मागणीमध्ये मोठी वाढ होणार

विशेष म्हणजे डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा हा प्रस्ताव सरकारला अशावेळी प्राप्त झाला आहे. अलीकडेच पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य केंद्र सरकारने साध्य केले आहे. जे २० टक्के इतके निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता केंद्र सरकारने डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्यास, इथेनॉलच्या मागणीमध्ये मोठी वाढ होणार आहे. दरम्यान, पर्यावरण संरक्षण आणि खनिजतेलाच्या आयातीवरील अवलंबवित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

इथेनॉलची निर्मिती प्रामुख्याने ऊस आणि मका या दोन पिकांपासून होते. याशिवाय काही प्रमाणात अन्य खराब झालेली धान्य देखील इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जातात. मागील वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे ऊस उत्पादन काहीसे कमी राहण्याची शक्यता पाहता, केंद्र सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळे इथेनॉल निर्मिती उद्योगाने आपला मोर्चा मका खरेदीकडे वळवला होता. परिणामी, इथेनॉल निर्मितीमध्ये या दोन पिकांना खूप महत्व आहे. अशातच आता डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा सकारात्मक निर्णय झाल्यास, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Web Title: Sugarcane and maize farmers will get benifits as ethanol will also be used in diesel after petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 04:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.