एक बातमी अन् स्विगीच्या शेअरमध्ये मोठी उसळी; दिवसभरात 6 टक्क्यांहून अधिक वाढला
कधी-कधी तुम्ही एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून असे काहीतरी मागवण्याचा विचार करता, जे तुम्हांला इतर कोणालाही समजू नये. असे वाटते. हीच बाब लक्षात घेऊन फुड डिलीव्हरी कंपनी स्विगीने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. ज्यामुळे आता तुम्हांला आपली ऑर्डर गोपनीय ठेवता येणार आहे. मग ते पार्टीच्या वस्तू असोत किंवा वेलनेस प्रॉडक्ट्स असो. अशा वापरकर्त्यांसाठी स्विगीने इनकॉग्निटो मोड अर्थात गुप्त मोडची सुविधा सुरू केली आहे.
स्विगीची अनोखी सुविधा सुरु
लोकप्रिय फुड डिलीव्हरी कंपनी स्विगीने आपल्या ग्राहकांसाठी ही अनोखी सुविधा सुरु केली आहे. तिला ‘इनकॉग्निटो मोड’ असे नाव देण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना आपल्या ऑर्डरबाबत गोपनीयता राखायची आहे. त्यांच्यासाठी ही एक अभूतपूर्व सुविधा असणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. आज (ता.६) कंपनीकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. जे ग्राहक स्विगीकडे ऑर्डर करतील. त्यांची ऑर्डर ही हिस्ट्रीमध्ये देखील पाहायला मिळणार नाही. आपल्या ग्राहकांना खासगीरित्या ऑर्डर करण्याचा अनुभव घेता यावा. यासाठी कंपनीने हे फिचर लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जे ग्राहक सरप्राईझ ऑर्डर किंवा अन्य वैयक्तिक मार्गाने ऑर्डर करण्याचा विचार करत असेल. तर त्यांना ही सुविधा खुप उपयोगी ठरणार आहे.
हे देखील वाचा – ‘या’ कुंटूंबाने दिला लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट; वाचा… कितीये किंमत!
काय म्हटलंय कंपनीने या सुविधेबाबत
सध्याच्या घडीला सामाजिक संवाद अधिक व्यापक होत आहे. असे असताना आपल्या जीवनातील काही पैलू आहेत. जे आपण खासगी ठेवण्यास प्राधान्य देतो. हीच बाब लक्षात घेऊन स्वीगीने ही सुविधा सुरू केली आहे. याबाबत बोलताना स्वीगीच्या फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी म्हटले आहे की, “गुप्त मोड वापरकर्त्यांना वर्धित गोपनीयतेसह स्विगीच्या विविध ऑफरचा आनंद घेण्यास अनुमती दिली जाते. त्यामुळे तुम्ही जेवण ऑर्डर करत असाल किंवा झटपट जेवणाची खरेदी करत असाल. तर हे वैशिष्ट्य तुमच्या निवडीनुसार वैयक्तिक असेल, त्याबाबत कोणाला समजणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.”
स्विगी फुड, इंस्टामार्ट दोन्हीवर उपलब्ध असणार
स्विगीने ही सुविधा पुर्णपणे गोपनीय ठेवली आहे. स्विगीची इनकॉग्निटो मोड अर्थात गुप्त मोड ही सुविधा स्विगी फुड आणि इंस्टामार्ट अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. ही सुविधा अशा ग्राहकांसाठी असणार आहे. जे आपली जेवणाची ऑर्डर गोपनीय ठेवण्याची इच्छा बाळगून आहेत. यामध्ये स्विगी, इंस्टामार्ट पर व्यक्तीगत वेलनेस प्रॉडक्ट देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता या ग्राहकांना कोणतीही चिंता न करता, आपली ऑर्डर खरेदी करता येणार आहे. त्यांची ऑर्डर इतरांना मुळीच दिसणार नाही.
कंपनीचे म्हणणे आहे की, सध्या ही गुप्त मोड सुविधा ही केवळ 10 टक्के स्विगी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. लवकरच ती सर्व वापरकर्त्यांसाठी विस्तारित करण्याची योजना आहे. ही सुविधा वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या कार्टमधील गुप्त मोड पर्याय टॉगल करणे आवश्यक असणार आहे.