तब्बल 47,500 कोटी संपत्तीची मालकीन, वाचा... कोण आहे ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला!
झोहो कॉर्पोरेशन या भारतीय फिनटेक कंपनीबाबत सर्वच जाणून आहोत. चेन्नईस्थित राधा वेम्बू या झोहो कॉर्पोरेशनच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 47,500 कोटी रुपये आहे. या संपत्तीसह त्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला अब्जाधीश बनल्या आहेत. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या 2024 हुरून इंडिया रिच लिस्टमधून ही बाब समोर आली आहे. त्यात देशातील सर्वात श्रीमंत ३०० व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. राधा वेम्बू यांची उद्योगविश्वातील यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश
हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये नायकाच्या फाल्गुनी नायर, अरिस्ता नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल आणि बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांसारख्या प्रसिद्ध नावांचा देखील समावेश आहे. मात्र, राधा वेम्बू या यादीत अव्वल आहे. त्या चेन्नईस्थित जागतिक तंत्रज्ञान कंपनी झोहो कॉर्पोरेशनच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत.
राधा वेम्बू यांचा जीवनप्रवास
1972 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेल्या राधा वेम्बू यांचा उद्योगविश्वातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. चेन्नईच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास येथून औद्योगिक व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केली. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने टेक उद्योगातील त्यांच्या आगामी उद्योगाचा भक्कम पाया घातला गेला. त्यांनी आपला भाऊ श्रीधर वेम्बू सोबत झोहो कॉर्पोरेशनची स्थापना केली. जी आज सॉफ्टवेअर क्षेत्रातील जागतिक कंपनी बनली आहे.
हे देखील वाचा – देशाच्या जीडीपीबाबत चिंतेचे कारण नाही; GDP घसरणीबाबत शक्तिकांत दास यांचे सष्टीकरण
आहेत कॉर्पस फाउंडेशनच्या संचालक
जगभरात झोहो कॉर्पोरेशनचे लाखो वापरकर्ते आहेत. कंपनीत राधा वेम्बू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तिच्याकडे झोहोमधील मोठा हिस्सा आहे. ती कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक असलेल्या झोहो मेलसाठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करते. याशिवाय त्या कॉर्पस फाउंडेशनच्या संचालकही आहेत. झोहो कॉर्पोरेशनच्या यशाचे श्रेय राधा वेम्बू यांनी केलेल्या नवकल्पनांचा अवलंब आणि ग्राहकांच्या समाधानासाठीच्या वचनबद्धतेला दिले जाऊ शकते.
सामाजिक कार्यातही पुढाकार
राधा वेंबूच्या कर्तृत्व हे व्यावसायिक जीवनाच्या पलीकडे देखील आहे. त्या त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रयत्नांसाठी ओळखल्या जातात. विशेषत: शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात त्यांच्या कॉर्पस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि वंचित समुदायांना आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. समाजाचे देणे लागण्याची त्यांची बांधिलकी ही त्यांच्या सामाजिक कार्यातून दिसून येते.