(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
12 वीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने १५ हून अधिक AI टूल्स विकसित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या कंपनीत काम करण्यासाठी वडिलांना दरमहा २ लाख रुपये देतो आणि त्याने जवळपास ५ लाख विद्यार्थ्यांनादेखील प्रशिक्षणही दिले आहे. या मिळालेल्या यशानंतरही तो म्हणतो की लोकांकडून शिकण्यातूनच सर्वात मोठे धडे मिळतात.
राऊलचा AI प्रवास त्याच्या नवव्या वर्षाचा असल्यापासून सुरु झाला. ॲडोबीमध्ये त्याचे वडिल नोकरीला होते. त्यामुळे उच्च दर्जाचं तंत्रज्ञान त्याला सुरुवातीपासूनच ओळखीचं होतं. ही उच्च दर्जाची तांत्रिक उपकरणे वापरण्याची संधी त्याला सुरुवातीपासूनच मिळाली होती. ज्यामुळे त्याला तंत्रज्ञान क्षेत्रातील उपयोग, कार्ये आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची ओळख झाली. त्यानंतर त्याने एआय बद्दल हळूहळू शिकायला सुरुवाती केली. त्याचा इंट्रेस वाढत गेला. त्याने सर्चबद्दल शिकायला सुरुवात केली. या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. हळूहळू, त्याने एआयच्या शक्यतांवर प्रयोग करण्यास सुरुवात केले. तिथूनच त्याने आपला एआय स्टार्टअप सुरू केला.
पुढे १२ वर्षांचा होईपर्यंत, त्याची उत्सुकता वाढली. त्याला ‘मीबॉट’ नावाच्या रोबोटमध्ये इंट्रेस्ट वाढला. त्याने शाळेच्या शैक्षणिक प्रकल्पासाठी बनवला होता. टेक्नॉलॉजीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याच्या ही सुरुवात होती. तेव्हापासून राऊलने मीबॉट, रेस्क्यू एआय, झॅपगॅप, इन्व्हेस्टो एआय आणि फीडफाय यांसारखी १५ हून अधिक AI उत्पादने विकसित करायला सुरुवात केली. या सर्व प्रकल्पांमध्ये, तांत्रिक प्रात्यक्षिकांऐवजी त्याने व्यावहारिक समस्या सोडवणारे टूल्स विसकीत करण्यावर विशेष भर दिला.
आज, १२वीत असतानाच, राऊल सुमारे १५ कर्मचाऱ्यांची एक स्टार्टअप कंपनी सांभाळतो. या कर्मचाऱ्यांपैकी एक त्याचे वडील आहेत, ज्यांना तो दरमहा २ लाख रुपये पगार देतो. ही व्यवस्था ऐकायला थोडी विचित्र वाटत असली तरीही राऊल याकडे उद्योगातील अनेक दशकांचा अनुभव असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याची एक संधी म्हणून पाहतो.
अजू जोसेफ यांनी ॲमेझॉन, ॲडोबी, विप्रो आणि आयबीएम यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. राऊलचा विश्वास आहे की हा अनुभव एका रात्रीत किंवा फोनवर शिकता येत नाही. राऊल म्हणतो की, वडिलांसोबत काम केल्यामुळे त्याला टेक कंपन्या कशा चालतात आणि वाढतात हे समजण्यास मदत होते. त्याने गंमतीने असेही म्हटले की, कंपनीत वडिलांचे असणे हे “माझ्या मार्केटिंगसाठी चांगले आहे.”






