एक ग्लास पाणी मागितले, टेकवले 1,260 रुपयांचे बिल; अमेरिकी आदरातिथ्याचा मुद्दा बनला चर्चेचा विषय!
भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला खूप महत्व आहे. अगदी आपल्याकडे कोणीही आले तरी चटकन आपण त्यांना पाणी देतो. ही आपल्याकडील आदरातिथ्याची परंपरा आहे. मात्र, आता बंगळुरूमधील एका युट्युबरला अमेरिकेत धक्कादायक अनुभव आला आहे. त्याला अमेरिकेत एका बॉटल पाण्यासाठी 1,260 रुपयांचे बिल चुकते करावे लागले आहे. त्याने आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर याबाबत पोस्ट केली असून, याबाबत आता सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात भारतात होणारे योग्य ते आदरातिथ्य आणि अमेरिकेतील आदरातिथ्याच्या घसरलेल्या स्तराबाबत चर्चा झाली आहे.
काय म्हटलंय ईशान शर्माने आपल्या पोस्टमध्ये?
गोव्याच्या BITS पिलानीचा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचा विद्यार्थी आणि युट्युबर असलेल्या ईशान शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्वात मोठा संस्कृती शॉक – अमेरिकी हॉटेल! यांना आदरातिथ्य करणे समजतच नाही! विशेष म्हणजे हे ग्राहकांकडून टीप मागतात. आणि मोफत एक ग्लास पाणी देखील पाजत नाही.” सहानुभूतीचा पूर्णपणे अभाव आहे. जे खूपच अविश्वसनीय आहे. असेही त्याने म्हटले आहे.
हेही वाचा : मुकेश अंबानींचा नवा डाव… Jio कडून मिळणार मोफत वायफाय; BSNL, Airtel, Vi ची वाढली चिंता!
त्याने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी फ्लाईटमध्ये थकून, रात्री दोन वाजता हॉटेलमध्ये पोहचलो. एवढ्या रात्री मी त्यांच्याकडे पाणी मागितले तर त्यांनी माझ्या हातात 200 मिलीची बॉटल टेकवली. जिची किंमत 14.99 डॉलर अर्थात 16,800 रुपये इतकी होती. विशेष म्हणजे हे हॉटेल 200 डॉलर अर्थात एका दिवसाचे राहण्याचे 16,800 रुपये बिल असणारे हॉटेल आहे. विशेष म्हणजे आपण अमेरिकेतील तीन, चार आणि पाच स्टार हॉटेलमध्ये राहिलो असून, आपला अनुभव हाच असल्याचे त्याने म्हटले आहे.
My biggest culture shock – American Hotels
They just don’t get hospitality.
Funny how they ask for tips but won’t even give complementary water.
I stayed at 3 star, 4 star AND today 5 star hotel (Caesar’s Palace)
Maybe I’m spoilt with Taj hotels in India.
But basic things… pic.twitter.com/RkB84F69R0
— Ishan Sharma (@Ishansharma7390) August 12, 2024
काय म्हटलंय युजर्सने?
रोहित घुमारे (@ghumare64) या युजरने याबाबत लिहिले आहे की, भारतीय हॉटेल हे युरोपीय हॉटेल आणि अमेरिकेन हॉटेलपेक्षा अनेक पटीने चांगली आहेत. भारतात आपल्याला अतिरिक्त सुविधा मिळतात. अन्य एक युजर काशिफ अन्सारी यांनी म्हटले आहे की, अमेरिकी नागरिक आदरातिथ्य मिळवण्यासाठी आशियात येतात. तुम्हाला केवळ दक्षिण पूर्व आशिया आणि भारतातच चांगले आदरातिथ्य मिळू शकते.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकन हॉटेल्स आदरातिथ्य करण्यात मागे आहेत? की एक वेगळी संस्कृती आहे. यावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, अमेरिकन हॉटेल्स त्यांच्या पाहुण्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात कमी पडतात. तर काही लोक म्हणतात की हा केवळ एक वेगळा दृष्टीकोन आहे.