Teacher Awards 2026: १२३ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; कधी आणि कुठे होणार वितरण?

Maharashtra Teacher Awards 2026: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ साठी १२३ शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरला मुंबईत वितरण करण्यात येणार आहे.
Maharashtra Teacher Awards 2026
फोटो सौजन्य - एआय
Published on: 
Updated on: 
  • राज्यातील १२३ शिक्षकांना सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

  • प्राथमिक, माध्यमिकसह आठ प्रवर्गांत निवड

  • दि. ३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण

Maharashtra Teacher Awards 2026: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२५-२६ च्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारां’ची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यंदा विविध आठ प्रवर्गांतून एकूण १२३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.

'या' विभागात पुरस्काराचे करण्यात आले वितरण

राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये प्राथमिक विभागातील ३८, तर माध्यमिक विभागातील ३९ शिक्षकांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी १९ पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका प्रवर्गात आठ, विशेष शिक्षक (कला) आठ, विशेष शिक्षक (क्रीडा) आठ, दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकांसाठी एक आणि स्काऊट-गाईड प्रवर्गात दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

Maharashtra Teacher Awards 2026
CBSE 12 Exam 2027: विद्यार्थ्यांची सायन्सकडेच धाव! इंग्रजीनंतर 'हा' ठरला दुसरा सर्वात पसंतीचा विषय

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार

समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. राज्यात १९६२-६३ पासून ही पुरस्कार योजना राबविली जात आहे. २०२१-२२ पासून या पुरस्काराचे नाव बदलून ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ असे करण्यात आले.

Maharashtra Teacher Awards 2026
Drought Students Relief: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
Q

यंदा किती शिक्षकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे?

A

सन २०२५-२६ साठी विविध आठ प्रवर्गांतून एकूण १२३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Q

सन २०२५-२६ साठी विविध आठ प्रवर्गांतून एकूण १२३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

A

या पुरस्कारांचे वितरण ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.

Q

या पुरस्कार योजनेची सुरुवात कधीपासून झाली आणि नाव कधी बदलण्यात आले?

A

राज्यात १९६२-६३ पासून ही पुरस्कार योजना राबवली जात असून, २०२१-२२ पासून या पुरस्काराचे नाव ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ असे करण्यात आले आहे.