‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल जाहीर; छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांची बाजी..! उद्या पुढील सुनावणी
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केंद्रनिहाय आणि शहरनिहाय विद्यार्थ्यांचे मार्क जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा ५ मे रोजी देशातील ५७१ शहरांमधील चार हजार ७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. तर २३ जून रोजी फेरपरीक्षा होऊन, तिचा निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जुलैला होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी सरस
परंतु, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जारी करण्यात आलेली आकडेवारी पाहता, आता छोट्या शहरांमधील विद्यार्थी देखील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना टक्कर देत आहे. लखनऊ (35), कोलकाता (27), लातूर (25), नागपूर (20), फरिदाबाद (19), नांदेड (18), इंदूर (17), कटक आणि कानपूर (16-16), कोल्हापूर, नोएडा, साहिबजादा अजित सिंग नगर (14-14), आग्रा आणि अलिगढ (13-13), अकोला आणि पटियाला (10-10), दावणगेरे (8) आणि बनासकांठा (7) या शहरांतील विद्यार्थ्यांनीही 700 हून अधिक गुण मिळवून उत्तम कामगिरी केली आहे. NEET चा अभ्यासक्रम उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात विलीन करण्याच्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल!
छोट्या शहरातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक
विशेष म्हणजे 700 पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थीच छोट्या शहरांमधील नाही तर दुसऱ्या श्रेणीतील 650 ते 699 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही छोट्या शहरातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यात प्रामुख्याने 509 शहरे आणि 4044 केंद्रांमध्ये तर 650 ते 699 गुण मिळवणारे विद्यार्थी 509 शहरे आणि 4044 केंद्रांमधील आहे. तर 600 ते 649 गुण मिळवणारे विद्यार्थी 540 शहरांमध्ये आणि 4484 केंद्रांमध्ये आणि 550 ते 599 दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी 548 शहरांमध्ये गुण मिळवले आहे.
काय सांगतो मागील वर्षीचा निकाल?
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नीट परीक्षेचा निकाल उत्तम लागला आहे. नीट 2023 मध्ये, 700 ते 720 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 116 शहरे आणि 310 केंद्रांमधील आहेत. 650 ते 699 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 381 शहरे आणि 2431 केंद्रातील आहेत. त्याचप्रमाणे, 600 ते 649 पर्यंत गुण मिळवणारे उमेदवार 464 शहरे आणि 3434 केंद्रातील होते. या बदलामुळे आता केवळ मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण देशातील हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.