फोटो सौजन्य- सोशल मीडिया
या भरती मोहिमेत सहाय्यक प्राध्यापक (संगणक शास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (गणित), सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (ड्रोन), प्रोजेक्ट असोसिएट (IoT), मेंटेनन्स इंजिनिनियर (सिव्हिल), प्रोजेक्ट असोसिएट (SMAC), प्रोजेक्ट असोसिएट (E&ICT), पर्सनल असिस्टंट, अकाउंट्स असिस्टंट, फॅकल्टी (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोजेक्ट असोसिएट (IT) आणि प्रोजेक्ट असोसिएट (Lab) यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.
एकूण रिक्त पदांमध्ये विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, सर्व नियुक्त्या या पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाच्या आणि एकत्रित मानधनावर असणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात, पात्रता निकष, मानधन, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख आणि वेळ तसेच इतर नियम व अटींसाठी NIELIT छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.nielit.gov.in/recruitments/AUR) भेट द्यावी, असे आवाहन कार्यकारी संचालकांकडून करण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि उच्च शिक्षण किंवा तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC






