फोटो सौजन्य- सोशल मीडिया
यापूर्वी दिनांक १८ मे २०२६ रोजी शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी दिवाळीची सुट्टीची तारीख वेगळी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जाहीर करण्यात आली होती . परंतु यामध्ये सध्या अशिंक बदल करण्यात आला आहे.
या नव्या सुधारित बदलानुसार, आता दिवाळीची सुट्टी गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून ती बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता सुट्ट्यांचा कालावधी पुढे ढकलण्यात आला आसला तरी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीची मजा घेता येणार आहे.
या सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने धनत्रोदशी, दिवाळी पाडवा म्हणजेच बलप्रतिपदा आणि भाऊबीज यांसारख्या सुट्ट्यांचा समावेश होतो. या सुट्ट्या ६ नोव्हेंबर, १० नोव्हेबर आणि ११ नोव्हेंबर रोजी येताता. या सर्व महत्त्वाच्या दिवशी येणाऱ्या तीन मुख्य सार्वजनिक आणि स्थानिक सुट्ट्यांचा समावेश शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या या नवीन सुट्ट्याच्या कालावधीतच होणार आहे.
Ans: आधीची सुट्टी २ ते १४ नोव्हेंबर होती, जी आता बदलून ५ नोव्हेंबर २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ अशी करण्यात आली आहे.
Ans: सुधारित परिपत्रकानुसार सुट्ट्या गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असतील.
Ans: धनत्रोदशी, दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज यांसारखे महत्त्वाचे सण या सुट्ट्यांच्या कालावधीत येतात.






