वर्धा जिल्ह्यातील 'या' नामांकित महाविद्यालयात 32 पदांसाठी भरती; 16 जुलैला होणार मुलाखती!
उच्च शिक्षणानंतर शिक्षक आणि तत्सम नोकरीची इच्छा बाळगून असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नगर परिषद, हिंगणघाट संचलित जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, निदेशक (एफटीआय), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : नगर परिषद, हिंगणघाट
रिक्त असलेली पदे :
1. व्याख्याता
2. निदेशक (एफटीआय)
3. संगणक लिपीक
4. प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर
5. शिपाई
एकूण रिक्त पद संख्या : 32 पदे
नोकरीचे ठिकाण : हिंगणघाट
कशी होणार निवड : मुलाखतीद्वारे
कुठे होणार मुलाखत अर्थात पत्ता : नगर परिषद, हिंगणघाट संचलित जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट.
मुलाखतीची तारीख : 16 जुलै 2024
मुलाखतीची वेळ : सकाळी 10:00 वाजता
कशी होणार निवड
– नगर परिषद, हिंगणघाट संचलित जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध रिक्त पदांसाठी होणाऱ्या या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
– मुलाखतीला जाताना उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सोबत आणायची आहेत.
– मुलाखत 16 जुलै 2024 या दिवशी होणार आहे.
– मुलाखतीला हजर राहण्यासाठी TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://wardha.gov.in/ ला भेट द्या.