SSC GD Bharti Updates : एसएससी जीडी कॉन्स्टेबल निकाल २०२६ होणार जाहीर; अशी तपासा गुणपत्रिका
या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण २५,४८७ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यात विविध सुरक्षा दलांमधील (जसे की BSF, CISF, CRPF, SSB, ITBP आणि असम रायफल्स) कॉन्स्टेबल पदांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या आणि सहभागी झालेल्या उमेदवारांना निकालाच्या प्रतीक्षेनंतर थेट ssc.gov.in या पोर्टलवर जाऊन आपला निकाल, गुणपत्रिका आणि कट ऑफ लिस्ट तपासता येणार आहे.
New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या
लिखित परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल, ज्यामध्ये शारीरिक दक्षता परीक्षा (PET), शारीरिक मानक परीक्षा (PST), वैद्यकीय तपासणी (DME) आणि कागदपत्र पडताळणी (DV) यांचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने अधिकृत वेबसाइटवरून गुणपत्रिका डाउनलोड करू शकतील.






