Asha Bhosle Died : "शिक्षणाची नौका हाती नव्हती, पण संगीताने गाठला सुरांचा किनारा!" आशा भोसलेंचं शिक्षण काय?

ज्येष्ठ पार्श्वगायिका Asha Bhosle यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील Breach Candy Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
फोटो सौजन्य - Social Media
फोटो सौजन्य - Social Media
Published on: 
Updated on: 
  • आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले
  • मुंबईच्या Breach Candy हॉस्पिटलात दाखल करण्यात आले
  • सुरुवातीचे शिक्षण 'बालमोहन विद्यामंदिर' या शाळेत झाले

आपल्या संगीताच्या जादूने जगभरातील अनेक संगीत प्रेमींचे गेली अनेक दशके मनोरंजन करणारे स्वर हरपले. भारतातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी, त्यांना मुंबईच्या Breach Candy हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. हृद्यविकाराचा झटका आल्याचे कारण अनेक वृत्तवाहिन्यांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आशा भोसले यांच्या नातीने सोशल मीडिया पोस्ट करत "आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग होऊन त्यांना खूप थकवा लागल्यामुळे हॉस्पिटलात दाखल केले आहे" अशी माहिती स्पष्ट केली. उपचारदरम्यान आशा भोसले यांची प्राणज्योत माळवली आणि भारतीय संगीत सृष्टीचा एक महत्वाचा आवाज कायमचा दुरावला.

आशा भोसले यांचे शिक्षण किती?

गायिका आशा भोसले यांचे शिक्षण फार नव्हते. त्यांच्या सुरुवातीचे शिक्षण 'बालमोहन विद्यामंदिर' या शाळेत झाले पण पुढे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी पूर्ण वेळ संगीतावर लक्ष देण्याचे ठरवले. एकंदरीत, आशा भोसले यांचे संपूर्ण शिक्षण संगीतातच झाले आहे आणि संगीतातील त्यांचे पहिले गुरु हे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर होते. जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नाही.

जरी शिक्षण झाले नसले तरी आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रात कळस गाठला होता. त्यांनी त्यांच्या साहित्य अभ्यासावरून तसेच योगदानावरून  University of Amravati आणि University of Jalgaon मधून  Doctorates मिळवली. तसेच University of Salford मधून पदवीचा अभ्यास केला आणि पदवीधर झाल्या. त्या जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या 'Doctor of Literature' (D.Litt.) प्राप्तकर्त्या होत्या.

आशा भोसले यांनी आतापर्यंत किती गाणी गायलीत?

आशा भोसले यांनी एकूण 12,000 पेक्षा जास्त गाणी गायले आहेत. आशा भोसले यांनी देशातील जवळजवळ सगळ्याच भाषेत गायन केले आहे.