गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नं. 270/2026 कलम 308 (2), 351 (1) BNS सहकलम 7 PCA नुसार खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टोन क्रेशर उदयोजक विवेक प्रभाकर बिजवे (वय 62) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्या नंतर जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता गुन्हा दाखल झाला आहे.
पैसे नाही दिले तर तुमचे धंदे बंद करेन- अधिकाऱ्यांची धमकी
फिर्यादी याने म्हंटल्या प्रमाणे विजय गायकवाड हे बार्शी टाकळी इथून जात असताना त्यांनी फिर्यादी यांच्या कडे १५ हजर रुपयांची मागणी केली. त्यांच्या सह इतर साथीदार यांना पैसे मागण्यात आले. १९ मार्चला तिथून जात असताना हा सगळा प्रकार घडला आहे. त्यानंतर त्यांनी शासकीय घरी जाऊन १५ हजार रुपये दिले आणि नंतर १ एप्रिलला अधिकाऱ्यांनी कॉल करून तुमचे धंदे बंद करेन अशी धमकी दिली अस या तक्रारीत म्हटला आहे. पुरावा म्हणून ऑडियो क्लिप सादर करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच अधिकारी सक्तीच्या रजेवर
अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होताच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल आहे. मात्र अधिकाऱ्याने केलेलं आरोप हे फेटाळून लावले आहेत. आपण रॉयल्टी भरण्यास सांगितल होत अस अधिकाऱ्यांनी म्हटल आहे. सध्या तरी अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पुढील कारवाई काय केली जाते हे आता पाहावे लागणार आहे.
Dhule Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Ans: अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Ans: स्टोन क्रशर व्यावसायिक विवेक बिजवे यांनी तक्रार दाखल केली.
Ans: अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.






