दहावीच्या निकालानंतर अकोल्यातील विद्यार्थ्याने कमी गुणांमुळे आत्महत्या केली. तर सोलापुरातील निकिता कुचेकरने प्रतिकूल परिस्थितीत सर्व विषयात 35 गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होऊन जिद्दीचं उदाहरण ठरली.
पहिल्या दिवशी Vijay Maharaj Khawale यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली, तर Sanjay Maharaj Pachpore यांनी रामकथा सादर केली. संपूर्ण आठवडाभर विविध नामवंत कीर्तनकार दररोज रात्री ८ वाजता सेवा देणार आहेत.
“महापुरुषांचा अपमान आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला. महापुरुषांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये होत असून त्यावर कारवाई होत नसल्याने समाजात संताप वाढत असल्याचे म्
अकोला येथील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेत ‘गोमाता सन्मान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली.
अकोल्यात गेमिंग अॅपवर ओळख करून विवाहित तरुणाने हरियाणातील तरुणीला प्रेमाच्या आमिषाने बोलावून 5 दिवस घरात ठेवले. पोलिसांनी तिची सुटका केली असून आरोपी ताब्यात आहे; प्रकरणावरून तणाव वाढला.
अकोला जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप झाला आहे. स्टोन क्रशर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. ऑडिओ पुराव्याच्या आधारे कारवाई करत अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
अकोल्यात पतीने 8 वर्षांच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला असता आई मध्ये पडली. संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. आरोपीने स्वतः पोलिसांत हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
अकोल्यात 24 वर्षीय रविना पवार हिचा पतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. आरोपी पती ताब्यात असून 8 दिवसांचे बाळ चाईल्ड लाईनकडे…
अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे एएसआयने अश्लील मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्रकरण समोर येताच अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या घटनेचा खून असल्याचा उलगडा झाला. घरगुती वादातून वहिनी आणि पुतण्याने काकाचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी काही तासांतच दोघांना अटक केली
अकोल्यात 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाळकरचा मृतदेह नाल्यात आढळला. दुर्गंधीमुळे नागरिकांनी माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होणार आहे.
संतापजनक घटना अकोल्यातून समोर आली आहे. एका २४ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शहरात संताप व्यक्त करण्यात येत…
अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या २ फेऱ्या होणार आहे.
अकोल्यातील कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलेला अश्लील व्हिडिओची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेकडून 5 लाख रुपये उकळण्यात आले. धर्मांतराचा दबावही टाकल्याचा आरोप आहे.
अकोल्यात प्रेमविरोधामुळे निराश झालेल्या तरुणाने इंस्टाग्रामवर भावनिक रील शेअर करत विषप्राशनाचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल होताच सायबर सेल व पोलिसांनी 20 मिनिटांत शोध घेऊन रुग्णालयात दाखल केल्याने तरुणाचे प्राण वाचले.
विविध ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरुद्ध लढलेले पक्ष देखील आता काही ठिकाणी एकत्रित येताना दिसून येत आहे.