संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून महापालिकेच्या कचरा गाडीवर कंत्राटी चालक म्हणून काम करणाऱ्या मामाच्या मुलाला जुन्या वादातून दोन आत्या भावांनी लोखंडी हातोडा घालून गंभीर जखमी केले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला आहे. तर मित्राला वाचविण्यासाठी धावलेल्या मित्रालाही मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मदनी चौक ते टाकळकर सोसायटी परिसरात घडली आहे.
फारेस अब्दुल अजिज अलकसेरी (३२, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही तासात मामेभावाचे मारेकरी अहमद खलील बादाम (वय ४०), अदनान खलील बादाम (वय ३५, दोघे रा. टाकळकर सोसायटी, बारी कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत फारेस याचा मिञ सय्यद शहेजाद अली उर्फ सिराज सय्यद नासेर अली (वय ३०, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फारेस हा रविवारी सकाळी त्याचा फिर्यादीसोबत कचरा गाडी घेऊन मदनी चौक परिसरात आला होता. फारेस हा सुपरवायझरशी बोलण्यासाठी गाडीतून खाली उतरला. त्याचवेळी अहमद आणि अदनान तेथे आले. अदनानच्या हातात हातोडा, तर अहमदच्या हातात लाकडी दांडा होता. जुन्या वादातून दोघांनी फारेसशी वाद घालत त्याच्यावर हल्ला केला. अदनानने हातोड्याने वार केले, तर अहमदने दांड्याने त्याच्या डोक्यावर व मानेच्या भागात हल्ला केला. वार अडविण्याच्या प्रयत्नात फारेसच्या डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली. फारेसला वाचविण्यासाठी शहेजादमध्ये पडला असता त्याच्यावरही हल्ला केला. अदनानने हातोड्याने शहेजादच्या कानावर, तर अहमदने दांड्याने डोक्यावर वार केला.
मारहाण करून बापाने मुलाला संपवलं
दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.






