पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती.
दोन तरुणांनी एकत्र केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी सामूहिक आत्महत्या केल्याुमुळे ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परदेशात असलेल्या कुख्यात गँगस्टर निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद झाला असून, त्याच्या घरावर छापेमारी केली असता त्याच्या घरात पोलिसांना जिवंत काडतूसे अन् सोने सापडले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गौतमीच्या गाडीचा अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील तिच्या गाडीत होती असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबाने केला होता. तसेच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती.
गेल्या नऊ महिन्यात सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून एकप्रकारे पुणेकरांवर डिजीटल हल्ला करत तब्बल ३२१ कोटी ५६ लाख ९९ हजार ३९५ रुपये लुटले आहेत.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली. महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवरात्रोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, काही मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम पाळले नाहीत. याच पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीमंता बझार पुणेकडून गुंतवणुकदार गोळा करून जादा व्याज देण्याचा बहाणा केला जात होता. मदनकुमार बाळासाहेब शिंदे (कौलगे, गडहिंग्लज) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी कोंढवा, चंदननगर, मुंढवा तसेच चतु:श्रृंगी परिसरातील बंद फ्लॅट फोडले आहेत. चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.
पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. अशातच आता आणखी आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत.
रांजणगाव एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून घरात घुसून हल्ला करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दोघांना केवळ दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास सागर हा त्याच्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी भरतवाडा चौकात गेला होता. या दरम्यान त्याला त्याचा एक परिचित मित्र जित याचे त्याच्या मित्रांसोबत भांडण होत असल्याचे दिसले.
बॅरिस्टर काही वर्षे आकार टुल्स लि. मध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन अलीकडेच ठेकेदारामार्फत तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू केले होते.
खानावळीच्या पैशातून झालेल्या वादात सहकाऱ्याचा खून करुन पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला गुजरात येथील जहाजातून अटक करण्याची कामगिरी नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे ऋषी पेट्रोल पंपावर शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे.