कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा, जयसिंगपूर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे.
दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीससह दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी कॅम्पात १७ सप्टेंबर रोजी घडला आहे.
कवठेएकंद गावात अलीकडेच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे.
घायवळबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकर खूनप्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. बंडू आंदेकर व कुटूंबाची १८ कोटींची मालमत्ता निष्पन्न केली आहे.
लग्नाचे वचन देऊन महिलेसोबत शारिरीक संबंध निर्माण करून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुण्यातील टोळ्यांच्या ''डोळ्यांत'' धडकी भरवणारी कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्याबरोबरच त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर आर्थिक ऑडिटची कात्री लावली आहे.
पिंपरीत दांडिया पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणातून १९ जणांच्या टोळक्याने कोयते व लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
निलेश घायवळ टोेळीवर पुणे पोलिसांनी अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायदा (मोक्का) कारवाई केली आहे. निलेश घायवळचाही या गुन्ह्यात समावेश केला आहे.
गांजा विक्रीप्रकरणात पुन्हा पोलिसांनी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाइल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खोतवाडीतील आयोध्यानगर येथे घडली आहे.
बिजलीनगरच्या नागसेन झोपडपट्टीत सोमवारी दुपारी धारदार हत्याराने हल्ला करून २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जळगाव महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याला अखेर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.