सौजन्य फोटो - सोशल् मडीया
हातावरील टॅटू ठरला महत्त्वाचा धागा
घटनेनंतर मृत महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. महिलेच्या हातावर बदामाच्या आकारात ‘अक्षय’ असे नाव गोंदवलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे नाव तिच्या कुटुंबीयांशी संबंधित असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.पोलिसांनी विविध माध्यमातून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी दुपारनंतर नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात येऊन मृतदेहांची पाहणी केली. त्यानंतर मृत महिला पल्लवी बनकर आणि तिचा चार वर्षांचा मुलगा दक्ष असल्याचे निष्पन्न झाले.
पतीच्या निधनानंतर नैराश्य?
पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी यांच्या हातावरील ‘अक्षय’ हे नाव त्यांच्या पतीचे होते. अक्षय बनकर यांचे सुमारे दीड महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनामुळे पल्लवी मानसिकदृष्ट्या खचल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी मुलासह हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.






