सौजन्य फोटा - सोशल मि़डीया
ठेकेदार बनून रचला सापळा
ओमकार रामचंद्र फसले हा आरोपी गावातच लपून बसल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिस थेट गावात गेल्यास आरोपी पसार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराचे वेशांतर करून गावातील एका पानटपरीवर संपर्क साधला. ‘उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. वाळूचा हायवा चालवण्यासाठी चालक हवा असून, एका ट्रिपचे १० हजार रुपये देतो,’ अशी बतावणी करण्यात आली. पानटपरी चालकाने ही माहिती ओमकारच्या मित्राला दिली. पैशांच्या आमिषाने ओमकार तेथे आल्यानंतर वेशांतर केलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
एकाच गावातून तिघे ताब्यात
या कारवाईत ओमकार रामचंद्र फसले, भीमराव ऊर्फ शहादेव भगवान तांदळे, सुनील गणपत चव्हाण आणि सुनील कल्याण शेंडगे यांना अटक करण्यात आली. एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचून भीमराव तांदळे आणि सुनील चव्हाण यांना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दरोड्यासाठी टोळीला स्वतःचे वाहन उपलब्ध करून देणाऱ्या सुनील शेंडगे यालाही तिसगाव परिसरातून अटक करण्यात आली. तो मुख्य आरोपी परशुराम गायकवाड याचा साथीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात यापूर्वी सात आरोपींना अटक झाली होती. मात्र, उर्वरित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर वेशांतर आणि आमिषाचा डाव आखत पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली.






