गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक
सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सोड्डी परिसरात द्राक्षबागांच्या छाटणीसाठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील निलंगा येथील १० कुटुंबे गेल्या १५ वर्षांपासून रोजगाराच्या शोधात वास्तव्यास आहेत. परिसरात मजुरीचे काम मिळेल, त्या ठिकाणी जाऊन उदरनिर्वाह करणे, हाच त्यांच्या जगण्याचा आधार आहे. सोड्डी परिसरात कामासाठी आल्यानंतर निवासाची सोय म्हणून या कुटुंबांना एका बंद ढाब्यात राहावे लागत होते.
Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
दरम्यान, आज दुपारी हे कामगार छाटणीच्या कामासाठी येथील माजी सरपंचांच्या शेतात गेले असताना, त्यांच्या निवासाच्या ठिकाणी अचानक गॅसचा स्फोट झाला. परिसरात जवळपास सहा सिलिंडर असल्याने एकापाठोपाठ सहा मोठे आवाज झाल्याचे सांगण्यात आले. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्फोटानंतर आगीचे मोठे लोळ दिसू लागले. आग विझविण्यासाठी मदतीला जाण्याच्या तयारीत असलेल्या शाळेतील काही कर्मचाऱ्यांनाही पुन्हा स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी सुरक्षित अंतरावर थांबणे पसंत केले. घटनेची माहिती मंगळवेढा येथील अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेत कामगारांच्या निवासाचे मोठे नुकसान झाले.
स्फोटाच्या ठिकाणापासून काही अंतरावर माध्यमिक शाळा असल्याने या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघा
या आगीत कामगार कुटुंबांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू आणि अन्य संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले. याशिवाय चार दुचाकीही जळून खाक झाल्या. त्यापैकी दोन दुचाकी काही महिन्यांपूर्वीच नवीन खरेदी केल्या होत्या. रोजगारासाठी वर्षानुवर्षे कष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने या कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे.
गेल्या १५ वर्षांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून परगावी राहणाऱ्या या कुटुंबांना आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. रोजच्या मजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांना या दुर्घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तलाठी, ग्रामसेवक आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.






