प्रतिस्पर्धी उमेदवारांना आवश्यक तेवढी मते मिळवण्यात अपयश आल्याने त्यांचे डिपॉझिट निवडणूक कार्यालयाने जप्त केले, असे पॅनेल प्रमुख गिरीष जाधव यांनी सांगितले.
सरपंच साळुंखे यांच्यासह सर्वच सात सदस्यांनी निवडणुकीत केलेला खर्चाचा हिशेब दिला नसल्याची तक्रार माजी सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे केली होती.
वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात बळीराम साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साठे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
गुवाहटी वारी करणारे शहाजी बापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने शेकापला मदत केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
मोहिते-पाटलांवर टीका करा. काय बोलायचे ते बोला. पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही, असा इशारा खासदार पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.
नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना रात्री उशिरा पर्यंत प्रतीक्षाच राहीली असल्याचे दिसून आले आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकाच्या पदासाठी ही चुरस आहे
एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना विजापूर रोडवरील सुशील नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देश प्रक्रिया सुरु आहे. मात्र अशुभ तारखेचे कारण देत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
Solapur News : सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकांसाठी शहरातील सर्व प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या आरक्षणांबरोबर महिलांच्या आरक्षणांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर विमानतळावर 'नई जिंदगी'कडील बाजूने सर्वच विमानांचे लँडिंग होते. तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेकऑफ होते. बुधवारी दुपारी नई जिंदगी भागात काही जण पतंग उडवत होते.
ढरपूरहून बसमधून उतरुन मंगळवेढा शहरात जात असताना या दोघींची नजर त्या बालिकेकडे गेली. तिला मायेने जवळ घेऊन वडिलाचे नाव, आईचे नाव विचारले असता ती केवळ एकच शब्द बोलत असल्याने आई,…
Local Body Elections 2025: सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायात निवडणूका जाहीर झाल्या आहेत. इच्छूक उमेदवारांची तोबा गर्दी पक्षश्रेष्ठीकडे होत आहे.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 40 लाख 91 हजार 9996 लाभार्थ्यांपैकी 13, लाख 92 हजार 965 लाभार्थ्यांनी इ कार्ड काढण्यात आल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत "मिशन स्वाभिमान" ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूर मार्फत राबविण्यात येत आहे. यावेळी प्रशासनाने सर्वांना प्रोत्साहित केले.
शिंगडगाव जिल्हा परिषद शाळेतील एका इमारतीच्या बाहेरील स्लॅबचा भाग सोमवारी दुपारी अचानक कोसळला. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना टळली.