लातूर शहराची मुख्य बाजारपेठ गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी असलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिक सहन करत आहेत.
लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग कोणता असावा, यावर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले आहेत. यामुळे पेच निर्माण झाला आहे.
पर्यावरण जगविण्यासाठी लातूरमध्ये आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनने अविरत काम करत २४०० दिवसांचे स्वप्नं साकार केले आहे. रोज ४ तास श्रमदान करून हे स्वप्नं साकार करण्यात आले आहे
शेतातली ती लहानशी झोपडी, त्यात बनवलेलं स्वादिष्ट जेवण आणि सर्वांनी एकत्र केलेलं वनभोजन, पूर्वी हा आनंद काही निराळाच असायचा. परंतु आता मात्र पूर्ण कुटुंब शेतात एकत्र जमणं अवघडच.
लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे 16 पैकी तब्बल 11 उमेदवार निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि यावेळी निलंग्यात प्रचंड गडबड दिसून आली. अचानक वेगवेगळ्या घडामोडी पहायला मिळाल्या आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांची धामधूम सुरु झाल्याचे दिसून आले
Latur Highway: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कारभारामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याची कुणीच दाद घेत नसल्याने नागरिक वैतागून गेले आहेत.
नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी दीपावली सणानिमित्त स्वतःच्या गावी आल्यानंतर हत्तीबेट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पर्यटन वाढले आहे.