सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील निकी नगर भागात राहणारा सुनील कोळी (वय २५) हा तरुण नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. यादरम्यान, एका भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीज कारने त्याला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण आणि जोरदार होती की, सुनील कोळी हवेत उडून रस्त्याशेजारील एका कमानीच्या आत जाऊन फेकला गेला. या भयानक अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह कमानीच्या आत पडल्यामुळे सुरुवातीला हा अपघात आहे, घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज कसून तपासले. या फुटेजची पाहणी केल्यानंतर एका भरधाव मर्सिडीज कारने सुनीलला उडवल्याचे स्पष्ट झाले. हा घातपात नसून एक भयानक हिट अँड रनचा प्रकार असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला.
हेही वाचा: Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा
या प्रकरणात पोलिसांनी कोमिल गायकर नावाच्या चालकाला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. परंतु, ज्या मर्सिडीज कारने धडक दिली, त्या गाडीवर ‘विधानसभा सदस्य’ (MLA) असे लिहिलेले स्टिकर लावलेले असल्यामुळे प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. हा अपघात कोणत्या आमदाराच्या गाडीने केला? किंवा हा स्टिकर कोणीतरी रुबाब दाखवण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरला होता का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. राजकीय दबावापोटी खरी माहिती लपवली जात आहे का आणि पोलीस कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Ans: कल्याण पश्चिमेकडील निकी नगर भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सुनील कोळी या तरुणाला भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
Ans: खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून कोमिल गायकर नावाच्या चालकाला अटक केली आहे.
Ans: ज्या मर्सिडीज कारने धडक दिली, त्यावर 'विधानसभा सदस्य' (MLA) असे स्टिकर असल्यामुळे आणि नेमका चालक कोण याबाबत संशय असल्यामुळे चर्चा सुरू आहे.






