काय घडलं नेमकं?
रविवारी सकाळच्या सुमारास किकवी-केंजळ रस्त्यावरून गावातील काही नागरिक नेहमीच्या कामासाठी जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती हालचाल न करता पडलेली दिसली. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ राजगड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
व्यक्तीची ओळख पटली नाही
मृत व्यक्ती वय अंदाजे ४० वर्षे असून, त्याच्या अंगावर निळ्या रंगाचे जर्किन, निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, राजगड पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची शहानिशा करत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तांत्रिक तपास करत आहेत.
Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासमधील ऑफिस बॉयला अटक केली आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही ऑफिस बॉयने काढले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये घडली.
काय घडलं नेमकं?
आरोपीचं नाव विकास गायकवाड (३५ वर्ष) असे आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. त्याने क्लासला जायला नकार दिला. यामुळे वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Ans: भोर तालुक्यातील किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला.
Ans: नाही, अद्याप ओळख पटलेली नाही.
Ans: अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.






