येरवडा जेलच्या भिंतीआतून रचला हल्ल्याचा कट?" मंदार किवळेवरील गोळीबारात १९ वर्षांच्या अर्थव मारणेचं कनेक्शन उघड!

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ल्याचे धागेदोरे थेट येरवडा जेलमधील १९ वर्षीय अर्थव मारणेपर्यंत! ६ आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी; शस्त्रपुरवठ्याचा तपास सुरू...
Court Firing Investigation
सौजन्य फोटो - सोशल मिडीया Court Firing Investigation
Published on: 
Updated on: 
  • कोर्ट हल्ल्यात ६ आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी,तर एक अल्पवयीन ताब्यात

  • येरवडा जेलमधील १९ वर्षीय अर्थव मारणेने कारागृहातून शस्त्रे पुरवल्याचा संशय

  • घटनास्थळावरून दोन पिस्तुले व पुंगळ्या जप्त; फरार आरोपींचा शोध

शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरदिवसा न्यायालय परिसरात झालेल्या या थरारक हल्ल्याचे धागेदोरे आता थेट येरवडा तुरुंगात असलेल्या आरोपीपर्यंत पोहोचले आहेत. तुरुंगात असलेल्या १९ वर्षीय आरोपीचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Court Firing Investigation
वाळूमाफियांची दादागिरी! शासकीय कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...

एकाच टोळीतील ६ आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

शिवाजीनगर कोर्ट हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेले अक्षय सुभाष चव्हाण (२०), अमोल रामचंद्र चव्हाण (४८), स्वप्नील बाजीराव गवळी (२८, तिघे रा. संतोषनगर, कात्रज), ओंकार ऊर्फ बाब्या संतोष पवार (१८, रा. आंबेगाव पठार), सूरज साधू मळेकर (२२, रा. मोहननगर, धनकवडी) आणि सत्यम सदाशिव मोरे (२५, रा. कात्रज) या सहा जणांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी एकाच टोळीतील असून, या कटात एका अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनास्थळावरून देशी पिस्तुले व पुंगळ्या जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसांच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेले कोयते, वाहन आणि फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.

Court Firing Investigation
मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

हल्ल्याचं येरवडा जेल कनेक्शन; कोण आहे अर्थव मारणे?

या संपूर्ण हल्ला प्रकरणात अर्थव सोपान मारणे (वय १९) याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अर्थव मारणे हा सध्या येरवडा जेलमध्ये असून न्यायालयीन कोठडीत आहे. कारागृहात राहूनच त्याने हल्लेखोरांना शस्त्रे उपलब्ध करून दिली असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यासाठी शस्त्रे कशी पुरवली आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

अवघ्या १९ वर्षांचा अर्थव मारणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वीच, म्हणजे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने भारती विद्यापीठ हद्दीतील चंद्रभागा चौकाजवळ सापळा रचून त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याच आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यात तो सध्या येरवडा जेलमध्ये बंद आहे.

Q

शिवाजीनगर कोर्ट हल्ला प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे?

A

अटक केलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या कटात एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Q

या हल्ल्याचे येरवडा जेलशी काय कनेक्शन समोर आले आहे?

A

येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या १९ वर्षीय अर्थव सोपान मारणे याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्याने कारागृहातूनच हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा संशय आहे.

Q

अर्थव मारणे याला यापूर्वी केव्हा आणि कोणत्या गुन्ह्यात अटक झाली होती?

A

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने चंद्रभागा चौकाजवळ सापळा रचून त्याला अटक केली होती; त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती आणि तो आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये आहे.