

ताथवडेत प्रेमप्रकरणातील वादातून तरुणाने आयुष्य संपवले
शेवटच्या व्हिडीओत प्रेमविरहाच्या वेदना मांडत "काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू" असा संदेश दिला
मुलीच्या भावाच्या विरोधासह सर्व अँगलने पोलिसांचा तपास सुरू
पुणे: सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात छोट्या-छोट्या कारणास्तव अनेकजण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं पाहायला मिळतंय. काहीजण अल्पशा प्रेमभंगामुळे नैराश्यात चुकीचं पाऊल उचलताना दिसतायेत. अशातच आता पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ताथवडे येथील एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून मृत्यूला कवटाळल्याची घटना समोर आली आहे. त्याने अखेरच्या व्हिडिओ संदेशात "काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू" असं म्हणत आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये दिसतंय की, एक तरुण आपल्या प्रेमविरहाच्या वेदना व्यक्त करत आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओनंतर तरुणाने डोळ्यात पाणी आणून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
"मी तुला VC करायला लावलं होतं. पण तू केली नाही. मला माहिती नाही तू आजकाल कुठं बिझी असलेस काही.. हा माझा तुझ्यासाठी शेवटचा मेसेज असेल. मी दररोज मरून मरून जगण्यापेक्षा एकटाच मेलेलं बरंय.. मला ही गोष्ट कळून चुकलीये की माझं स्वतःचं कोण नाहीये. जे कुणी माझं होतं मला त्यांची गरज नव्हती. मला तुझी गरज होती. मी जाणार आहे त्यामुळे मी रडणार पण नाही. माझ्या घरच्यांनी नाही म्हटलं नव्हतं, तुझ्या भावानं येऊन सांगितलं होतं. त्यामुळं आता तू रहा नीट... मला माझी किळस यायला लागलीये."
पोलिसांकडून तपास सुरू दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला असून वेगळ्या अँगलने देखील या घटनेचा तपास केला जात आहे. मुलीच्या भावाचा लग्नाला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील ताथवडे येथील ही घटना कशामुळे घडली?
प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातील वादातून आणि भावनिक नैराश्यातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
तरुणाच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये काय समोर आले आहे?
व्हिडीओमध्ये तरुणाने व्हिडिओ कॉल (VC) न केल्याची खंत, प्रेमविरहाच्या वेदना तसेच मुलीच्या भावाचा विरोध असल्याचा उल्लेख करत शेवटी "काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू" असे म्हटले आहे.
या प्रकरणात पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?
मुलीच्या भावाचा लग्नाला विरोध असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस वेगळ्या अँगलने आणि सर्व बाजूंनी घटनेचा अधिक तपास करत आहेत.