

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील ३९ कोटी खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. बुधवारी (दि. १६) नगरपंचायतीने ही योजना आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून झाल्याचे जाहीर करताच शुक्रवार (दि.१८) भाजपाने पलटवार करीत वडगाव नगरपंचायत साठी ४० कोटींची पाणी योजना माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतूनच मंजूर झाली आहे, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू आल्याचे सांगण्यात आले.
मागील साडेचार वर्षांत नगराध्यक्ष यांनी राज्यातील बदलत्या राजकीय परीस्थिती नुसार वेळोवेळी रंग बदलून नगरपंचायतीत मनमानी कारभाराला प्राधान्य दिले व वडगावकर नागरीकांचा सपशेल अपेक्षाभंग केला आहे.वडगाव शहरातील विकासकामे मार्गी लावण्याबाबत मविआ सरकार काळात आलेले अपयश झाकण्यासाठी आत्ता भाजपा-शिवसेना युती सरकारने मंजुरी दिलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न वडगावचे नगराध्यक्ष व तालुक्याचे आमदार दोघांकडून केला जात आहे परंतु विकासकामे केल्याचा कितीही आव आणला तरी वडगावकर जनता सुज्ञ आहे.पुढील सहा-सात महिन्यांतच नगरपंचायत निवडणुकीच्या निकालातून याची प्रचिती येईल.सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढून फसविण्याचे धंदे नगराध्यक्ष व आमदार यांनी बंद करावेत असा टोला भाजपा शहराध्यक्ष अंनता कुडे यांनी लागवला.
वडगाव मधील विकासासाठी भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे तसेच सर्व नगरसेवक यांनी,माजी मंत्री बाळा भेगडे यांची संयुक्त बैठक झालेंनंतर, बाळा भेगडे यांनी स्वतः पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनांक २ नोव्हेंबर २२ रोजी भेट घेऊन तालुक्यातील विविध विकास कामांची मागणी केली होती
यामधील वडगाव शहरातील पाणी योजनेसाठी ४० कोटी निधीची मागणी केली असता, वडगाव शहरातील पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे लवकर त्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करणार आहे.
जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर १५ जवळ जॅक वॉल बांधून हे पाणी लिफ्ट करून ३०० मी.मी व २०० मी.मी व्यासाच्या पाईपलाईन मधून हे पाणी वडगाव नजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती येथे फिल्टर प्लांट बसून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारा ही ड्रीम प्लॅनिंग योजना आहे या पाणी योजनेच्या माध्यमातून वडगाव शहरातील नागरिकांची पाण्याची होणारी गैरसोय कायमस्वरूपी मिटणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी दिली.