पुणे शहर (Pune City) पोलीस आयुक्तपदी नागपूरचे पोलीस आयुक्त असणारे तसेच क्रिकेट विश्वात भूकंप घडवणारे अमितेश कुमार ( Amitesh Kumar)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात आजच एमपीडी कायद्यानुसार शतक पूर्ण करणारे आणि शहरातील ११५ टोळ्यांवर मोक्का कारवाई करणारे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची महासमादेशक होमगार्ड मुंबई येथे बदली झाली आहे.
ईडीच्या कारवाईदरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्ष जेएमएमने त्यांच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना रांचीमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
खर्चासाठी पैसे देत नाही आणि फिरायचे स्वातंत्र्य देत नसल्याने पत्नीने आपल्या दोन साथीदारांसह मिळून थेट पतीचा काटा काढण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएम चा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच ...
पुरंदर तालुक्यातून सध्या अनेक कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करत असून काही इच्छुकही येत्या महिन्यात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार असल्याचे चित्र भाजपाचे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या निवास स्थानी दिसून आले आहे .
हिवाळा सुट्ट्यांचा आनंद घेऊन येतो पण त्याचबरोबर आरोग्यविषयक नवीन तक्रारी, विशेषतः हृदयाशी संबंधित समस्या देखील घेऊन येतो. हृदय विकाराच्या झटक्याच्या धोक्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी, विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे मत ...
कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान १० दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने १० दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) वरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी (29 जानेवारी) X वर एका पोस्टद्वारे ही बंदी वाढवण्याच्या आदेशाची माहिती शेअर केली.
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात हनुमानजींच्या ध्वजावरून तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी भीषण बनली आहे की गावात कलम 144 लागू करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत महेश शिंदे यांनी खटाव येथील निवासस्थानी वडील संभाजीराजे जिजाबा शिंदे व मातोश्री शीला शिंदे यांचे पाद्यपूजन करून आधुनिक श्रावण बाळाची भूमिका बजावली. पश्चिम महाराष्ट्राच्या भगिरथाची भूमिका बजावण्यासाठी आईवडीलांचे त्यांनी आशीर्वाद घेतल...