Vadgaon Maval Nagar Panchyat Election Result : वडगाव मावळमध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेची मोठ्या उत्साहात निवडणूक पार पडली आहे. यामध्ये अजित पवार गट आणि भाजपला मोठा विजय मिळाला आहे.
डान्सबारविषयी दैनिक नवराष्ट्रने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात डान्सबार बंदीच्या मागणीसाठी लक्षवेधी मांडली होती.
वडगाव मावळमध्ये महसूल कार्यालयामध्ये अधिकारी कामावर येत नसल्यामुळे नागरिकांनी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागिरकांनी नाराजी व्यक्त केली.
बिबट्याच्या मुक्त वावरामुळे भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
युनिट क्रमांक २ च्या पथकाने दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग करत असताना आरोपींकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ऊसाच्या शेतासह आता रानावनात आणि अगदी गावात बिबटे हल्ला करत आहेत. पुण्यातील औंध भागामध्ये देखील बिबट्या दिसला असल्याचे बोलले जात आहे. वडगाव मावळमध्ये देखील बिबट्या दिसून आला आहे.
वडगाव मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. यामध्ये उमेदवारीची अधिकृत घोषणा करताना १७ पैकी १४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
Maharashtra Local Body Election : वडगाव मावळमध्ये आजपर्यंत म्हणजेच १३ नोव्हेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे वडगावच्या राजकारणात उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक सत्तांतर ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
Monsoon News: वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
1913 साली टाटा धरण प्रकल्पासाठी भुशी गाव विस्थापित झाल्यानंतर ग्रामस्थांचे कायदेशीर पुनर्वसन झाले नव्हते. यानंतर आता त्यांना राहत्या घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले.
Local Elections 2025 : पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज (दि.08) जाहीर करण्यात आली असून, यावेळी महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे.
Local Body Election 2025 : वडगाव मावळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित म्हणून जाहीर करण्यात आले. यामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
वडगाव मावळ येथील नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरातील कार्यक्रमामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पालकांना खास आवाहन केले.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करण्यात आला. नाशिकमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
Lonavala Tiger Point New Project : लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली आहे. लोणावळ्याकडे पर्यटकांचा कल अधिक वाढणार आहे.