शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना केले आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ओमी कलानी यांच्यावर टीका केली आहे.
BJP Pune: मागील पंचवार्षिक निवडणुकीत महंमदवाडी प्रभागात भाजप पक्षाचे संजयतात्या एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महंमदवाडी-उंड्री ४१ प्रभागात भाजपाचे अनेक इच्छुक उमेदवार होते.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारीसाठी मातब्बरांची कसोटी लागली आहे.
Political News: हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सोमवार पर्यंत महापालिके निवडणुकीसाठी ४०० च्यावर अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवशी किमान १००० अर्ज दाखल होतील अशी गर्दी दिसून आली.
राज्यातील 14 ठिकाणी महायुती तुटलेली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना अनेक इच्छुकांकडून मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संपात व्यक्त केला जात आहे. या नाराजांना आवरण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचेही समोर…
भाजपच्या हट्टी आणि आग्रही भूमिकेमुळेच भाजप–शिवसेना युती तुटल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. युती तुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस शिल्लक असतानाच भाजपने थेट यादी जाहीर न करता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात भाजपने बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता दाखविल्याचे दिसते.
कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आपण एकटी महिला असूनही समर्थपणे पार पाडली, असे धनश्री तोडकर म्हणाल्या.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हिंदुत्ववादी नेते आक्रमक झाले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपकडे धारकऱ्यांसाठी काही जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत होती.
भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.