बॉलिवूड गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (फोटो - सोशल मीडिया)
बॉलीवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांना काल (दि.11) हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर आज त्यांची प्राण ज्योत मालावली आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला. आज आशा ताईंच्या जाण्याने भारतातील प्रत्येकजण हळहळला.सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर उद्या (दि.13) शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी 4 नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
हे देखील वाचा : केरळमध्ये सत्तांतर होणार! परिणय फुकेंचा विजयी विश्वास; म्हणाले, BJP ची SIR योजना प्रत्येक बूथपर्यंत
चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड
आशा भोसले यांनी 1948 साली आशा भोसले यांनी चुनरिया चित्रपटाद्वारे पार्श्वगायक क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. त्यांनी 12 हजार हून अधिक गाणी गाण्याचा विक्रम नोंदवला आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी ७ दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदीसह अनेक भाषांत हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना 2008 साली पद्मविभूषण, 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीने बॉलिवूडमध्ये महिला अभिव्यक्ती पुन्हा परिभाषित केली.
हे देखील वाचा : धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर
महाराष्ट्राचे भूषण आशा अन् लता मंगेशकर
संपूर्ण विश्वावर ज्या दोन बहिणींच्या आवाजाने जादू केली अशा दोन बहिणी म्हणजे आशा ताई भोसले आणि लता दीदी मंगेशकर. वयाच्या अगदी 10 व्या वर्षापासून त्यांच्या संगीतमय प्रवासाला सुरुवात झाली. दोन्ही बहिणींची शास्त्रीय संगीतावर विलक्षण पकड होती. आशा भोसले यांनी तब्बल 900 चित्रपटांमध्ये गाणी गायली. तर लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांना मोहित केले. आशा ताई भोसले यांनी 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन प्रत्येकाला थिरकायला लावले. त्यांच्या आवाजातील जादू तरुणाईला अक्षरशः धुंदावले. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज एक जोशपूर्ण वातावरण निर्माण करत असे. आशा भोसले आणि ओ पी नय्यर यांची जोडी प्रेक्षकांना भावली. 1960 ते 70 च्या दशकात आशा भोसले यांनी अभिनेत्री हेलन यांना आवाज देत बॉलीवुडवर राज्य केले. वयाच्या 90 व्या वर्षी देखील तितकाच्या ताकदीने गायन करणाऱ्या आशा भोसले यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.






