( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दीपिका, रणवीर आणि दुआ यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दुआ कधी चेहरा लपवताना, तर कधी वडील रणवीरसोबत खेळताना दिसत आहे. तिघांचेही हे गोंडस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटमध्ये दीपिकाचा बेबी बंपही स्पष्टपणे दिसत असून, त्यामुळे चाहत्यांचे विशेष लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
रणवीर आणि दीपिकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “बेबी दुआ आणि आमची मनं आणखी मोठी होत आहेत. तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.” फोटो समोर येताच चाहत्यांनी दुआला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला. अनेक चाहत्यांनी त्यांना ‘परिपूर्ण कुटुंब’ असंही म्हटलं आहे.
View this post on Instagram
दीपिका आणि रणवीर यांच्या आयुष्यात लवकरच आणखी एका बाळाचं आगमन होणार आहे. या जोडप्याने यावर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या घोषणेसोबत त्यांनी दुआचा एक गोंडस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दुआच्या हातात प्रेग्नन्सी किट दिसत होती.
दुसऱ्या बाळाच्या आगमनामुळे दुआ लवकरच मोठी बहीण होणार आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचंही या पोस्टमधून दिसून आलं.






