Hanuman Ansh OTT: ‘हनुमान अंश’चा ओटीटीवर धमाका! 5 भाषांमध्ये होणार रिलीज; जाणून घ्या तारीख अन् प्लॅटफॉर्म

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' हा कमी बजेटमधील सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने 404 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले. आता हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 रोजी हिंदीमध्ये सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
Hanuman Ansh OTT (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Hanuman Ansh OTT (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)Hanuman Ansh OTT (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • 'हनुमान अंश' 27 नोव्हेंबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार.

  • 29 नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाच भाषांमध्ये उपलब्ध होणार.

  • 2 कोटी बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने 404 कोटींची कमाई केली.

Hanuman Ansh OTT Release Date: कमी पैशात बनवलेला 'हनुमान अंश' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. कुणी विचार पण केला नसेल असा हा सिनेमा विक्रमी कमाई करून गेला. थिएटरमध्ये जबरदस्त चालल्यानंतर आता हा सिनेमा OTT वर यायला तयार झाला. फक्त हिंदीत नाही, तर हा सिनेमा आता वेगवेगळ्या भाषांमध्ये पण रिलीज होणार आहे. विशाल चतुर्वेदी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नेमका कोणत्या OTT वर येणार? कधी येणार? आणि किती भाषांमध्ये येणार? चला जाणून घेऊ.

• सोनी लिव्हवर कधी येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा आता OTT वर यायला सज्ज झाला. हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2026 रोजी OTT वर स्ट्रीम होणार आहे. हा सिनेमा सोनी लिव्हवर दाखवला जाणार आहे.

• नेटफ्लिक्सवर कोणत्या भाषांमध्ये येणार?

आता या सिनेमाच्या इतर भाषांमधल्या OTT प्रदर्शनाबद्दल पण माहिती बाहेर आलीय. मीडिया रिपोर्टनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा फक्त हिंदीत नाही तर तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती या भाषांमध्ये पण OTT वर येणार आहे. माहितीनुसार, 'हनुमान अंश' हा सिनेमा इतर भाषांमध्ये नेटफ्लिक्स या OTT वर येणार आहे. हा सिनेमा इतर भाषांमध्ये तुम्ही 29 नोव्हेंबरपासून बघू शकता.

• नेटफ्लिक्सने काय म्हटलं?

नेटफ्लिक्सने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. नेटफ्लिक्सने पोस्टमध्ये म्हटलंय की, 'श्रद्धेने आयुष्य बदलले पण भक्तीने हजारो लोकांचे जीवन बदलले. भगवान हनुमान यांच्या खऱ्या भक्ताची दिव्य कथा. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध'. 'हनुमान अंश' हा सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि गुजराती भाषांमध्ये रिलीज होईल.

• 2 कोटीचा सिनेमा 404 कोटीवर कसा गेला?

'हनुमान अंश' हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा या सिनेमाची फारशी चर्चा झाली नव्हती. पण तरीही या सिनेमाने ओपनिंगला 10 लाख रुपयांची कमाई केली. सोशल मीडियावर मिळत असलेल्या चांगल्या रिस्पॉन्सचा फायदा या सिनेमाला झाला. फक्त 2 कोटी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.

या सिनेमाने 404 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.म्हणजेच थिएटरमध्ये न बघितलेल्यांसाठी आता चांगली संधी आहे. हिंदीत बघायचा असेल तर 27 तारखेला सोनी लिव्हवर बघा, आणि दुसऱ्या भाषेत बघायचा असेल तर 29 तारखेला नेटफ्लिक्सवर बघता येईल.