(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Madhuri Dixit: चित्रपटसृष्टीतील ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’ या मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना माधुरीची एक वेगळी आणि वैयक्तिक बाजू अनुभवायला मिळत आहे.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम स्पर्धकांच्या ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची कसोटी पाहतो. मात्र, प्रश्नोत्तरांच्या या खेळासोबतच कार्यक्रमात अनेकदा मनोरंजक संवाद आणि खास आठवणीही रंगताना दिसतात. माधुरीदेखील या मंचावर आपल्या आयुष्यातील काही आठवणी आनंदाने शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळत आहे.
नुकतीच डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत तिने आपल्या लग्नाचा २७ वा वाढदिवस साजरा केला. ‘कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीचे तिच्या स्वत:च्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. नुकताच कोण होणार करोडपतीचा एक भाग प्रसारित झाला यात अमरावचीची स्पर्धक मृण्मयी किटुकले हिने या मंचावर एक खास गोष्ट केली जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्याकडे लग्नाची पत्रिका पहिल्यांदा देवाला वाहण्याची प्रथा असली, तरी मृण्मयीने लग्नाची पहिली पत्रिका माधुरीला दिली आणि तिला तिच्या आपल्या आनंदता सामील करून घेतले.
यावेळी लग्नाविषयी गप्पा सुरू असताना मृण्मयीने माधुरीकडे ब्रायडल स्टायलिंग टिप्स मागितल्या. तसेच तिने इन्स्पिरेशनसाठी माधुरीच्या साडी लुक्सचे स्क्रीनशॉट्स सेव्ह करून ठेवल्याचे सांगितले आणि लग्नाच्या दिवशी काय लूक करावा याबद्दल सल्ला घेतला. पारंपारिक भडक रंग आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेले पेस्टल कलर्स यावर चर्चा करताना माधुरी दीक्षितनं तिच्या लग्नाच्या वेळच्या खास साडीचा किस्सा सांगितला.
आपल्या लग्नातील लूक आणि भावनिक आठवण करून देताना माधिरी दीक्षित म्हणाली,’मी माझ्या लग्नात माझ्या आजीची नऊवारी साडी नेसलेली. आणि ती ब्लू कलरची होती. तिच्यावर मी शाल घेतली होती, ज्याच्यावर फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली होती. तर असा पर्सनल टच त्यात असला पाहिजे.”
माधुरीने पुढे सांगितले, ”तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नेसलं पाहिजे. कारण तो दिवस तुमचा असतो आणि तुमच्या कुटुंबाचा असतो. तर शुड बी युअर चॉईस..”






