

Bigg Boss Marathi 6 अनेक वळणांनंतर शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. खेळाचा Bigg Boss Marathi 6 Grand Finale अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरातील काही उर्वरित सदस्य एकेक करत या घराला रामराम करण्याची वेळ जवळ आली आहे. दरम्यान, आज भाऊच्या धक्क्यावर इतरांना रडवणारी राखी स्वतः रडताना दिसून आली आहे. यामागे कारणही तसे आहे. रितेशने भाऊच्या धक्क्यावर राखीची शाळा घेतली आहे.
एकंदरीत, राखी बिग बॉस मराठी पर्व सहामध्ये Wild Card म्हणून आली. संपूर्ण पर्वात राखीने इतरांना जाणूनबुजून डिवचने आणि भांडायला मुद्दा हुरकणे असा खेळ खेळला आहे, हे प्रत्येकालाच दिसून आले आहे. पण गेल्या आठवड्यात राखीच्या या खेळात एक मोठी चूक घडली. राखी आणि दिपालीमध्ये वाद झाला आणि या वादात राखीने दिपालीच्या चरित्रावर टिप्पणी केली, ज्यामुळे राखी वादात सापडली आहे. हा वाद भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे रितेशने राखीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
बिग बॉसने याबाबत Promo शेअर केलं आहे. या प्रोमोमध्ये राखी रडत आहे तसेच रितेश राखीला म्हणतो की, "इतरांच्या चरित्रावर जेव्हा बोललं जाईल तेव्हा मला उभं राहावं लागेल. तुम्ही का इतरांना मानसिक त्रास देत आहात?" राखीने मर्यादा ओलांडल्या असल्याचे रितेशने भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट केले तसेच Show चे काही Rules असतात त्याचीही आठवण करून दिली.
काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे?
या पोस्टखाली अनेक प्रेक्षकांनी त्यांची मते दिली आहेत. त्यातील अनेक प्रेक्षक तन्वीला या पर्वाची विजेती म्हणून पाहत आहेत तर राखीच्या असल्या वागण्याला कंटाळलेले प्रेक्षक राखीला सरळ घराबाहेर काढण्याची मते देत आहेत. तन्वीनंतर राकेश बापटलाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.