(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील वाढतं ध्वनीप्रदूषण, डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजाविरोधात ठाम भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. डीजेविरोधात स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील टिळक रोड परिसरात त्यांच्यावर हल्लाही झाला. मात्र, या घटनेनंतरही आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नसल्याचं बापट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विचारांना पाठिंबा देणारे अनेक लोक आता पुढे आले आहेत. याशिवाय त्यांना मराठी मनोरंजनविश्वातून देखील पाठिंबा मिळताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आरती सोलंकीने पोस्ट शेअर केली होती तर प्रसिद्ध गायक- संगीतकार अवधूत गुप्नेने देखील बापटांवर खास गाणं तयार केले. आता या पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विद्यानंद बापट यांच्यासाठी पोस्ट शेअर करत त्यांना शाबासकी दिली आहे.
Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.पोस्टमध्ये तिने लिहिले, “प्रिय विद्यानंद बापट…मनापासून आभार आणि शाबासकी…जागरूक नागरिक असण्याची व्याख्या नव्यानं मांडत आहेस.. अत्यंत स्पष्ट विचार… संयत, मुद्देसूद भाषा.. अविचल ठामपणा.. तुझ्या या वागण्याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. त्याचबरोबर तुझी दमछाक होऊ नये, याची काळजी वाटते आहे..सगळीच शहरं खडबडून जागी झाली आहेत.. तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं आहे..” या पोस्टच्या शेवट सोनालीने “तुम्हाला आणखी बळ मिळो” असं म्हणत आज ५ सप्टेंबर निमित्त त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत असला तरी काही नेटकऱ्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत त्यांना ट्रोलही केले आहे. या सर्व घटनांनंतरही ते त्यांच्या मतावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.






