फोटो सौजन्य - Social Media
Tabu ने केलेल्या या पोस्टमध्ये Tabu आणि Asha Bhosle दिसत आहेत. त्या दोघांच्या हातात एक Guitar आहे. या पोस्टखाली Tabu ने सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “मला माझा सगळ्यात खास दिवस विचारा… मला माझे अविस्मरणीय क्षण विचारा… मला विचारा की ‘माझ्या मनाला सगळ्यात जास्त स्पर्श करणारे काय आहे?’ आणि त्याच एकच उत्तर ‘आशाताईंनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेली सुंदर भेट ‘Guitar’! आशाताई, तुमच्यावरचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुमच्या गाण्यांतून आम्ही प्रेम, ओढ… वेदना आणि आवेग अनुभवला आहे आणि नक्कीच एकेदिवशी मी तुम्ही भेट केलेल्या या Guitar वर तुमचंच एखादं गाणं तुमच्यासमोर सादर करेल.”
अशा सुंदर कॅप्शनमध्ये Tabu ने व्यक्त केलेली आशाजींसमोर त्यांचंच एखादं गाणं सादर करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पोस्टखाली कॅप्शनमध्ये दोन्ही कलाकारांच्या असंख्य चाहत्यांनी ‘दोघांना एकत्र गाताना पाहायला आवडेल’ अशी इच्छा सांगितली. आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या काही क्षणात आशा भोसले यांच्या नातीने आशा भोसले यांना होणाऱ्या त्रासाबद्दल स्पष्ट केले. आशा भोसले यांच्या पार्थिवाची अंतिम क्रिया सोमवारी त्यांच्या राहत्या घरी होईल असे सांगण्यात आले आहे.






