(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. काल १८ ऑक्टोबर रोजी अभिनेत्यावर मुंबईतील जुहू येथे हल्लाकरण्यात आला या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला आहे. हल्लाच्या घटनेनंतर, र, लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. या ऑडिओमध्ये सलमान खानसोबत काम करणाऱ्या कोणालाही ठार मारण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली आहे. बिश्नोई टोळीने यापूर्वीही सलमान खानच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. सलमान खान सोबत सध्या कोणते कलाकार काम करत आहेत आणि कोणाला धोका निर्माण होऊ शकतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
या कथित धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानसोबत आगामी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी चर्चा सुरू झाली आहे. सलमान सध्या ‘मातृभूमी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री चित्रांगदा सिंहसोबत दिसणार आहे. चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अपूर्व लाखिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं मूळ नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं, मात्र नंतर त्याचं नाव बदलून ‘मातृभूमी’ ठेवण्यात आल्याचं वृत्त आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि नियोजित वेळापत्रक याबाबत अधिकृत माहिती तपासणं आवश्यक आहे.
सलमान खानच्या ‘मॉन्स्टर’चीही चर्चा
सलमान खानच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं नाव ‘मॉन्स्टर’ असल्याचं सांगितलं जात असलं, तरी निर्मात्यांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे. वामशी पैडीपल्ली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
ए. पी. ढिल्लन, कपिल शर्मा, रोहित शेट्टी आणि गुरू रंधावा यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींशी संबंधित ठिकाणी यापूर्वी हल्ले किंवा धमक्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत.बिश्नोई गँगने प्रत्येक हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, एका निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, सलमान खानसोबत काम करणाऱ्यांवर असे हल्ले सुरूच राहतील. आता या यादीत टायगर श्रॉफचाही समावेश झाला आहे. या खळबळजनक हल्ल्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.






