Amey Wagh: अमेय वाघचा लोकप्रिय डायलॉग आता गाण्याच्या रूपात! जळगावात रंगला खास लोकार्पण सोहळा

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील अमेय वाघचा ‘सहलीला जायचं, जायचं’ हा लोकप्रिय डायलॉग आता ‘झिम्मा ३’मध्ये गाण्याच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जळगावमधील केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या मैदानावर या गाण्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Amey Wagh:
Amey Wagh: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. अमेय वाघचा गाजलेला डायलॉग आता गाण्याच्या रूपात.

  2. ‘झिम्मा ३’मधील ‘सहलीला जायचं’ गाणं प्रदर्शित.

  3. जळगावात कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचा लोकार्पण सोहळा.

‘सहलीला जायचं, जायचं’ हे धमाल गाणं

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटातील अमेय वाघच्या तोंडी असलेलं ‘सहलीला जायचं, जायचं’ हे वाक्य प्रचंड लोकप्रिय झालं होतं. सोशल मीडियावरही या वाक्याची विशेष चर्चा रंगली. याच लोकप्रियतेला आता गाण्याचं स्वरूप देत ‘झिम्मा ३’मध्ये एक भन्नाट, मजेशीर आणि ठेका धरायला लावणारं गाणं तयार करण्यात आलं आहे. ‘सहलीला जायचं, जायचं’ हे धमाल गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

कलाकारांच्या डान्सला जळगावकरांनीही उत्स्फूर्त साथ

जळगाव येथील केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या मैदानावर या गाण्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, आर्चित देवधर, सुयोग गोऱ्हे, राजन भिसे, उदय सबनीस व सिद्धेश धुरी उपस्थित होते. गाणं प्रदर्शित होताच पाचही कलाकारांनी प्रेक्षकांसोबत त्यावर ठेका धरला. कलाकारांच्या डान्सला जळगावकरांनीही उत्स्फूर्त साथ दिली. कलाकार आणि प्रेक्षकांनी एकत्र अनुभवलेला हा गाण्याचा जल्लोष सोहळ्याचं खास आकर्षण ठरला.

पहिल्यांदाच गाण्यासाठी दिला आवाज

विशेष म्हणजे, या गाण्याच्या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, अर्चित देवधर आणि सुयोग गोऱ्हे यांनी पहिल्यांदाच गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. त्यामुळे या पाच मित्रांची ही नवी गाणारी बाजू प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरणार आहे. या गाण्याला __ जबरदस्त संगीत लाभलं असून __ यांनी गीतलेखन केलं आहे.

गाणंही तितकंच धमाल आणि मस्तीने भरलेलं

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “काही गोष्टी आपण ठरवून करत नाही, त्या आपोआप घडत जातात आणि प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ ही त्यातलीच एक गोष्ट. अमेयच्या या वाक्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. त्याच लोकप्रियतेतून या गाण्याची कल्पना सुचली. ‘झिम्मा ३’मध्ये पुरुषांची सहल आहे, त्यामुळे हे गाणंही तितकंच धमाल आणि मस्तीने भरलेलं असावं असं वाटलं होतं. हे गाणं करताना खूप मजा आली. प्रेक्षकही या गाण्याला भरभरून प्रेम देतील याची मला खात्री आहे.”

चित्रपट १ जानेवारी २०२७ प्रदर्शित

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा ३’ची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित हा चित्रपट १ जानेवारी २०२७ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी कलाकारांची तगडी फळी पाहायला मिळणार आहे.