Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलकात्यातील आयसर संस्थेच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर, कोरोनाला रोखण्यास कडूलिंब ठरू शकते उपयुक्त

कडूलिंबाच्या झाडाच्या सालीचा (Bark Of Neem Tree) अर्क भारतात अनेक आजारांवर औषध म्हणून वापरात आहे. विषाणू आणि जीवाणू विरोधी गुणधर्मासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारा घटक म्हणून कडूलिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना (Neem Useful For Preventing Corona) विषाणू संसर्गाची तीव्रता कमी करण्यात तसेच संसर्गाचा वेग रोखण्यातही कडूलिंब गुणकारी ठरणार असल्याचे आयसर (Eiser) कोलकाताच्या (Kolkata) संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

  • By साधना
Updated On: Mar 03, 2022 | 01:18 PM
neem leaves

neem leaves

Follow Us
Close
Follow Us:

कडूलिंब त्वचाविकार, पोटाचे विकार, मलेरिया अशा अनेक आजारांवरील उपचारांमध्ये खूप उपयुक्त आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की,  कोरोना प्रतिबंधावरही कडूलिंब (Bark Of Neem Tree Helpful To Treat And Reduce Coronavirus Spread) परिणामकारक असल्याची माहिती संशोधनातून मिळाली आहे. कोलकाता(kolkata) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (आयसर) (Eiser Institute Findings) या संस्थेने या विषयावर संशोधन केले आहे. कडूलिंबावर (Neem) आधारित औषधाची निर्मिती करण्याबाबतही आयसर विचाराधीन आहे.

[read_also content=”सावधान! सकाळच्या न्याहारीबरोबर चहा घेताय, मग हे वाचा, शरिरावर होतील असे गंभीर परिणाम https://www.navarashtra.com/health/health/drinking-tea-with-breakfast-causes-many-problems-read-full-article-nrak-248245.html”]

कडूलिंबाच्या झाडाच्या सालीचा अर्क भारतात अनेक आजारांवर औषध म्हणून वापरात आहे. विषाणू आणि जीवाणू विरोधी गुणधर्मासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारा घटक म्हणून कडूलिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना विषाणू संसर्गाची तीव्रता कमी करण्यात तसेच संसर्गाचा वेग रोखण्यातही कडूलिंब गुणकारी ठरणार असल्याचे आयसर कोलकाताच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे.

विषाणूजन्य आजारांवरील संशोधनावर आधारित एका नियताकलिकामध्ये या संशोधनावर आधारित शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात येऊ शकणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर कडुलिंबयुक्त औषध उपयोगी ठरणार असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. या संशोधनासाठी आयसर कोलकाताला कोलोरॅडो विद्यापीठाचे सहकार्य लाभले आहे.

घशाला झालेल्या संसर्गावर ज्या प्रकारे आपण द्रव स्वरुपातील औषधाचा वापर करतो, त्याचप्रमाणे कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी कडुलिंबयुक्त औषध तयार करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही. या औषधामुळे येणाऱ्या प्रत्येक कोरोना विषाणूच्या प्रकारावर नवीन औषध विकसित करण्याची गरज भासू नये असा प्रयत्न असल्याचे कोलोरॅडो विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कडूनिंबाच्या सालीच्या अर्कातून तयार झालेले औषध कोरोना विषाणूच्या वाढीचा वेग रोखण्यात अत्यंत परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कोलोरॅडो विद्यापीठाने या औषधाच्या चाचण्या मानवामध्ये केल्या असून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही आघाड्यांवर त्या औषधाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या औषधामुळे विषाणूच्या वाढीचा वेग मंदावतो. तसेच विषाणूची तीव्रता कमी करण्यास कडूलिंब उपयुक्त असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. औषध निर्मितीचे उद्दीष्ट ठेवून कडूलिंबाच्या सालीच्या अर्कातील नेमका कोणता घटक विषाणूविरोधी काम करतो याबाबत अभ्यास करण्यात येत असून त्यावर औषधाची मात्रा निश्चित करण्यात येणार असल्याचे या शोधनिबंधात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Neem tree bark is usefou for treating corona patients and preventing covid 19 spread nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2022 | 01:14 PM

Topics:  

  • Kolkata
  • Reasearch

संबंधित बातम्या

वैज्ञानिकांच्या हाती लागली ‘बुक ऑफ द डेड’! 3,500 वर्षांपासून दफन केलं होत… इजिप्शियन लोकांच्या मृत्यूनंतरच ते सत्य उलगडणार
1

वैज्ञानिकांच्या हाती लागली ‘बुक ऑफ द डेड’! 3,500 वर्षांपासून दफन केलं होत… इजिप्शियन लोकांच्या मृत्यूनंतरच ते सत्य उलगडणार

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला
2

Kolkata Law College Rape Case: “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
3

Kolkata Law College Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”,  विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव
4

Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”, विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.