भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक; गाडी झाली पलटी

वाहनाला ओव्हरटेक करून त्यांच्या पुढील वाहनाला धडक दिली. या अपघातानंतर स्कॉर्पिओ चालकाने स्वतःची ओळख स्थानिक रहिवासी म्हणून सांगितली.
भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक
भाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडकभाजप आमदाराच्या ताफ्यातील वाहनांना भरधाव स्कॉर्पिओची धडक
Published on: 
Updated on: 

चंदौली : उत्तर प्रदेशातील चंदौलीच्या सैदराज मतदारसंघाचे भाजप आमदार सुशील सिंह यांच्या ताफ्यातील वाहनांना एका अनियंत्रित स्कॉर्पिओने धडक दिली. एक पांढरी स्कॉर्पिओ आमदारांच्या ताफ्यात घुसली आणि एकापाठोपाठ अनेक वाहनांना धडकली. या घटनेत आमदारांच्या ताफ्यातील तीन वाहनांचे नुकसान झाले. अपघातात आमदारांची स्वतःची गाडीही उलटली. मात्र, सर्वजण सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

याबाबत आमदार सुशील सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मागे सुमारे १५ वाहनांचा ताफा होता आणि त्यांच्या पुढेही सुमारे पाच वाहने जात होती. त्यांच्या मागून जाणाऱ्या एका वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची स्वतःची गाडी उलटली. ज्या वाहनामुळे अपघात झाला, त्या वाहनाने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून त्यांच्या पुढील वाहनाला धडक दिली. या अपघातानंतर स्कॉर्पिओ चालकाने स्वतःची ओळख स्थानिक रहिवासी म्हणून सांगितली. मात्र, तो कोणत्याही नशेत असल्याचे दिसले नाही.

दरम्यान, ज्या पद्धतीने स्कॉर्पिओ चालकाने चार वाहनांना धडक दिली आणि त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, ती पद्धत अत्यंत संशयास्पद वाटते. सुशील सिंह आता या संदर्भात पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहेत.

कोण आहेत सुशील सिंह?

सुशील सिंह हे ब्रिजेश सिंह यांचे पुतणे आहेत. ते चंदौली येथील सैदराजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. त्यांनी २००२ मध्ये पहिल्यांदा बसपाच्या तिकिटावर धनापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रभू नारायण सिंह यांनी त्यांचा २६ मतांनी पराभव केला. त्यानंतर, त्यांनी २००७ ची निवडणूक पुन्हा बसपाच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली.

मनोज सिंह डब्ल्यू यांचा केला पराभव

सुशील सिंह यांनी २०१२ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि पुन्हा एकदा समाजवादी पक्षाचे प्रभू नारायण सिंह यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी २०१७ ची निवडणूक भाजपच्या तिकिटावर सय्यदराजा मतदारसंघातून लढवली आणि बसपाचे विनीत सिंह यांचा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून, त्यांनी समाजवादी पक्षाचे मनोज सिंह डब्ल्यू यांचा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा आमदार झाले