Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आफताबचा धक्कादायक खुलासा

श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) पोलिसांकडे मोठा खुलासा केला आहे.

  • By साधना
Updated On: Nov 18, 2022 | 01:49 PM
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आफताबचा धक्कादायक खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: श्रद्धा वालकर (Shradhdha Walkar Murder Case) हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. (Delhi Murder Case) तसंच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असं त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. आफताबने दिलेल्या या माहितीमुळे आता या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

चौकशीदरम्यान आफताब पोलिसांना म्हणाला की, श्रद्धा नेहमी त्याला गांजाच्या व्यसनावरुन ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्चावरून आणि मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण झालं. या भांडणानंतर आफताब घराबाहेर जाऊन गांजाचं सेवन करुन परत आला  श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे.

[read_also content=”मोठी बातमी! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी https://www.navarashtra.com/india/big-news-threat-to-blow-up-rahul-gandhi-with-a-bomb-nrps-345924.html”]

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी श्रद्धाची रात्री ९ ते १० दरम्यान गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आफताब रात्रभर मृतदेहाशेजारी बसून गांजाने भरलेली सिगारेट ओढत होता. आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. पाण्याचं बिल जास्त असल्याने पोलिसांना संशय आला होता. हेच बिल या हत्या प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा आहे. याशिवाय फॉरेन्सिकला किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.

हत्या केल्यानंतर आफताबने ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी करुन श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यात ठेवले. नंतर रोज रात्री घराबाहेर पडत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत विल्हेवाट लावली. याशिवाय मेहरुलीच्या नाल्यात काही हाडं सापडली आहेत. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.

दिल्ली कोर्टाने आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची नार्को-चाचणी करण्यासही परवानगीही दिली आहे. पोलीस आफताबला घेऊन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही जाणार आहे. आफताब आणि श्रद्धा फिरण्यासाठी गेलेल्या ठिकाणांची पोलीस पाहणी करणार आहेत. चौकशीदरम्यान, आफताबने आपण देहरादूनमध्येही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याचं सांगितलं होतं.

Web Title: Aftab poona walas new statement in shraddha walkar murder case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 01:47 PM

Topics:  

  • aftab poonawala
  • Shraddha walkar case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.