CJI Sanjeev Khanna: 'खुर्चीवर बसल्यानंतर आम्ही...'; वक्फ बोर्ड सुनावणीदरम्यान CJI संजीव खन्नांचे सूचक विधान

CJI संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर वक्फ कायदा 2025 विरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होत आहे.
maharashtra Politics (59)
Photo Credit- Social Media वक्फ बोर्डासंदर्भातील सुनावणी; CJI संजीव खन्नांचे सूचक विधान
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली :  वक्फ बोर्ड प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याआधी बुधवारीही या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी केलेले एक महत्त्वपूर्ण विधान चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "जेव्हा आम्ही न्यायाधीश म्हणून खंडपीठावर बसतो, तेव्हा आमचा धर्म हिंदू किंवा मुस्लिम राहत नाही. कोण सत्ताधारी आहे कोण विरोधी,  याचा विचार न करता आम्ही फक्त कायदेशीर युक्तिवादाच्या आधारे निर्णय घेतो."

वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर सुनावणी

CJI संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर वक्फ कायदा 2025 विरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होत आहे. केंद्र सरकारकडून वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याच्या समर्थनार्थ दिलेल्या उदाहरणावर CJI खन्ना यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

“आम्ही धर्मनिरपेक्षतेवर ठाम विश्वास ठेवतो” - CJI खन्ना

CJI खन्ना म्हणाले, “वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याचे मुद्दे आमच्या संवेदनशीलतेला धक्का देणारे आहेत. आम्ही न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी पार पाडताना धर्म बाजूला ठेवतो. आमच्यासाठी कोण पक्षकार आहे याला महत्त्व नाही, आम्ही फक्त युक्तिवाद ऐकतो आणि निर्णय देतो. जर धर्माचा विचार केला गेला, तर हिंदू न्यायमूर्तींनी वक्फशी संबंधित खटल्यांवर न्याय देऊ नये, असे होईल. पण आपली न्यायप्रणाली धर्मनिरपेक्षतेवर आधारलेली आहे.”

वक्फ कायद्याच्या काही तरतुदींवर न्यायालयाची टीका

खंडपीठाने वक्फ (सुधारणा) अधिनियम 2025 मधील काही तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्या केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ मंडळांमध्ये गैरमुस्लिम सदस्यांना नामनिर्देश करण्याची मुभा देतात. यासंदर्भात दाखल याचिकांवर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

वक्फ कायद्यावर तात्काळ स्थगिती नाकारली

काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यास तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, घोषित वक्फ संपत्तीचे गैर-अधिसूचना करणे, वक्फ मंडळात गैरमुस्लिमांचा समावेश करणे, आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत वक्फ मालमत्तेची पात्रता रद्द करणे यावर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.