नोएडा सेक्टर ६० मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी आंदोलन केले (फोटो - सोशल मीडिया)
Noida Sector 60 protest : नोएडा : सकाळी नोएडाच्या सेक्टर ६० मधील रस्त्यांवर एक भयानक चित्र दिसत होते. आठवड्याची सुरुवात कामावर जाण्याऱ्यांची वर्दळ आणि कामाची गडबड अशी दिसून येते. मात्र आजच्या दिवशी नोएडामध्ये नोकरदार वर्गाचा संताप उफाळलेला दिसून आला. नोएडामधील सेक्टर-६०, मध्ये शेकडो कर्मचारी जमले होते आणि घोषणाबाजी करत होते. खासगी कर्मचाऱ्यांनी सेक्टर ६० मधून जाणारा संपूर्ण रस्ता अडवला आहे, ज्यामुळे नोएडाची वाहतूक मंदावली आहे.
पगाराच्या मुद्द्यावरून नोएडाच्या रस्त्यांवर प्रचंड गदारोळ
नोएडातील विविध खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमध्ये बऱ्याच काळापासून असंतोष खदखदत होता. आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते बऱ्याच काळापासून पगारवाढीची मागणी करत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही. सोमवारी सकाळी हा संताप रस्त्यांवर उफाळून आला, जेव्हा ते एकत्र जमले आणि सेक्टर ६० चा मुख्य रस्ता त्वरीत अडवून घोषणाबाजी करू लागले.
हे देखील वाचा : जमिनीखाली 130 फुटांवर बुलेट ट्रेनचा ‘महाकाय’ प्रकल्प! दुसऱ्या TBM ची असेंबलिंग सुरू; पाहा कशी होणार खोदणी
नोएडाच्या रस्त्यावरील वाढता तणाव आणि बिघडत चाललेली वाहतूक कोंडी पाहून स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली. गोंधळाची बातमी मिळताच, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलत असून त्यांना समजावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सध्या पोलिसांचे प्राधान्य रस्ता मोकळा करणे हे आहे, जेणेकरून कार्यालयात जाणारे लोक त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचू शकतील. तथापि, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून वातावरण तणावपूर्ण आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
मीडिया रिपोर्टनुसार, फेज २ मधील मद्रासन कंपनीच्या टेंपरेरी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या टेंपरेरी कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, कंपनीने नवीन कामगार कायद्यातील तरतुदी लागू केल्या नाहीत, ज्यामुळे ते संतप्त झाले आहेत. सोमवारी सकाळी हजारो आंदोलक घोषणाबाजी करत कंपनीबाहेर जमले होते. आंदोलनावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
#WATCH | Uttar Pradesh: Vehicles and properties vandalised and stones pelted in Phase 2 of Noida where a large number of employees of a company gathered in protest over their demands for a salary increment. Heavy Police deployment made here to bring the situation under control.… pic.twitter.com/1B0axJZSBN — ANI (@ANI) April 13, 2026
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ
आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. जमाव हिंसक झाला. कंपनीच्या परिसरातील अनेक वाहने जाळण्यात आली आणि त्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. एका जिप्सीचे मोठे नुकसान झाले आणि ती उलटली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
हे देखील वाचा : त्यांच्यासोबतच्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन; PM मोदींनी व्यक्त केला शोक
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
फेज २ व्यतिरिक्त, सेक्टर १५ आणि ६२ मध्येही कामगारांनी गोंधळ घातला. यामुळे, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गासह नोएडातील अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि लोकांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर लोक अनेक तास अडकून पडले होते.






