Parliament Special Session: 19 सप्टेंबरपासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
Parliament Special Session : केंद्र सरकारनं (Modi Government) संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावले आहे. 18 सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरपासून नव्या संसदेतून कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे.
राजधानीत G20 शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतर हे विशेष अधिवेशन होणार आहे. पण या अधिवेशनात काय अजेंडा असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावले आहे. घोषणा झाल्यापासून दिल्लीतील घडामोडीला वेग आला आहे. संसदेच्या अधिवेशन बोलवण्यात आले त्यानंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटलाय.
गणपती ही बुद्धीची देवता आहे. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाचा श्रीगणेशा हा गणपतीचे स्मरण करुन केले जाते. याच पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीचा मुहूर्त हा नव्या संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी निवडण्यात आला आहे. संसदेची नवी इमारत बांधून पूर्ण झाली. तेव्हा त्याच्या उद्घाटनच्या वेळी अनेक धार्मिक चिन्हांना विशेष महत्त्व देण्यात आले होते.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. पण अधिवेशन कशासाठी हे गुलदस्त्यात असल्याने विरोधक केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. तर एक देश एक निवडणूक यासह 10 विधेयक मांडले जाण्याची चर्चा होतेय. दरम्यान, याच कालावधीत महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम असल्यामुळे विरोधक संतप्त झालेत. विशेष अधिवेशात भाजपच्या सर्व खासदारांनी आपली कामं रद्द केल्याची माहिती मिळत आहे. तसेच अधिवेशन काळात केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी, सचिव, कॅबिनेट सचिव यांना दिल्ली न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकापाठोपाठ वेगाने घडणाऱ्या घटना पाहून नेमके अधिवेशन काळात काय घडणार याची उत्सुकता वाढत चालली आहे.
Web Title: Special parliament session ganesh chaturthi time for entry of new parliament working from the second day of new parliament nryb