दिल्ली : गेल्या 12 दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत युक्रेनमधील विविध भागातून भारतीयांना मायदेशी आणले आहे(Union Minister in India with the last students trapped in the Russia-Ukraine war; ‘Operation Ganga’ a success).
सोमवारी बुडापेस्टमधून सर्व विद्यार्थ्यांना मायदेशात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी या विमानासोबत आले. बुडापेस्टमधून केंद्रीय मंत्री 6, 711 विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशात परतले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बुडापेस्टमधील अखेरच्या 6, 711 विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालो आहे. हे तरुण लवकरच आपल्या घरी पोहचलीत. लवकरच सर्वजण आपल्या आईवडिलांसोबत आणि कुटुंबासोबत असतील. त्यांच्या घरात आनंद आणि उत्साह असेल, असे ट्विट हरप्रीत सिंह पुरी यांनी ट्विट केले आहे.
आठवडाभरापासून ऑपरेशन गंगा अंतर्गत 16 हजार पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशात आणले आहे. खारकीव्ह, सुमी येथून सर्वांना मायदेश आणण्यात आले आहे.
रशिया हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती नाजूक आणि भयावह झाली होती. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यी आणि नागरिक अडकले होते. येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत मोहिम राबवली होती. याची जबाबदारी चार मंत्र्यांवर सोपवली होती. ज्योतिरादित्य शिंदे, हरदीप सिंह पुरी, किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह यांना हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया आणि पोलांड येथे पाठवण्यात आले होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची जबाबदारी या चार मंत्र्यांवर होती. व्ही.के. सिंह यांच्यावर पोलांड, हरदीप सिंह पुरी यांना हंगेरी, रोमानियाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्लोवाकियाची जबाबदारी किरेन रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आली होती.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






